अहमदनगर -पेडगाव-राशीन रस्त्यावरील सरस्वती नदीचा पूल आणि पेडगाव-श्रीगोंदा रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी यासाठी श्रीगोंदा तालुका युवक काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. श्रीगोंदा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन झाले.
उपअभियंता अरविंद अंपळकर हे कार्यालयात न आल्याने त्यांच्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव प्रशांत ओगले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. पेडगाव-श्रीगोंदा रस्त्याची आणि पेडगाव-राशिन रस्त्यावरील सरस्वती नदीच्या पुलांची अवस्था अत्यंत वाईट आहे. या मार्गांवरून ये-जा करताना नागरिकांना कसरत करावी लागते, असा आरोप प्रशांत ओगले यांनी केला.