महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ahmednagar Flood: पुरातून चालत जाण्याचे धाडस भोवले, युवक गेला वाहून - सीना नदी

अहमदनगर जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. (Ahmednagar Flood). एका घटनेत नगर-कल्याण महामार्गावरील सीना नदीत (sina river) एक जण वाहून गेला तर एकाला नागरिकांनी वाचवले आहे. (young man drown in ahmednagar)

अहमदनगर पूर
अहमदनगर पूर

By

Published : Oct 21, 2022, 1:45 PM IST

अहमदनगर: परतीच्या मान्सूनने जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून थैमान घातले आहे. या पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत असून ओढे, नदी-नाल्यांना अनेक ठिकाणी पूर आलेले आहेत (Ahmednagar Flood). अनेक ठिकाणी पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. एका घटनेत नगर-कल्याण महामार्गावरील सीना नदीत (sina river) एक जण वाहून गेला तर एकाला नागरिकांनी वाचवले आहे (young man drown in ahmednagar)

नगर-कल्याण वाहतूक वळवली:नगर-कल्याण महामार्गावर सीना नदीला पूर आल्याने पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे नगर-कल्याण वाहतूक ठप्प झाली आहे. नागरिकांनी पुलावरून जाऊ नये म्हणून पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाने या ठिकाणी बंदोबस्त ठेवून आपत्कालीन परस्तीतीत मदत कार्य पथक तैनात ठेवलेले आहे. मात्र तरीही काहीजण पुलावरून पाणी वाहत असताना देखील तो पार करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत.

दुसऱ्याला वाचवण्यात यश:अशाच एका घटनेत काल शुक्रवारी सायंकाळी एक युवक पुलावरून पायी जाण्याचे धाडस करत असताना वाहून गेला तर दुसऱ्या घटनेत वाहून जाणाऱ्याला नागरिकांच्या मदतीने बाहेर सुखरूप काढण्यात यश आले. वाहून गेलेला युवकाचे नाव देवतरसे असून तो गणपती मूर्ती बनवण्याच्या कारखान्यात कामगार आहे. काल सायंकाळी पोलिसांनी आणि नागरिकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र कुणाला न जुमानता त्याने पुलावरून पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला. पुलाच्या मध्यभागी पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो पुराच्या पाण्यात अडकला. त्यावेळी त्याने पुरातून पोहत पुढे जाण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रवाह वेगवान असल्याने शेवटी तो पुराच्या प्रवाहात वाहत गेला. या घटनेनंतर तातडीने पोलीस, महानगरपालिका पथक, अग्निशमन पथक या ठिकाणी दाखल झाले. रात्री उशिरा पर्यंत शोध कार्य सुरू असले तरी सदर युवक सापडला नाही.

अहमदनगर पूर

आयुक्तांचे आवाहन:सततच्या पावसाने सीना नदीला पूर आल्याने महानगरपालिका बचाव पथक तसेच अग्निशमन पथक तैनात केल्याची माहिती आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिली आहे. पोलिसांच्या मदतीने नागरिकांना पुलावरून ये-जा करण्यास मनाई केली असली तरी काही नागरिक अतिधाडस करत असून त्यांनी असे धाडस करू नये, प्रशासनाचे नियम पाळावेत असे आवाहन जावळे यांनी केले आहे. वाहून गेलेल्या युवका बाबत शोध कार्य सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. नदीला पूर असल्याने नगर-कल्याण महामार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details