अहमदानगर - अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथे येडूबाईची देवीची यात्रा भरली आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातील आदिवासी भील्ल समाजबांधवानी देवीचे दर्शन घेत देवीला नवस केले. येथे देवीचा नवस फेडण्यासाठी कोंबड्या आणि बकऱ्यांचा मोठया प्रमाणात बळी दिला जातो. महाराष्ट्रातील भील्ल समाजाचा हा एकमेव उत्सव असून एकमेकांचे सुख दुख, संवाद, लग्नकार्य, न्यायनिवाडा भील्ल बांधव याच ठिकाणी करतात.
पिंपळदरीच्या येडूबाई देवीची यात्रा उत्साहात
अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथे येडूबाईची देवीची यात्रा भरली आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातील आदिवासी भील्ल समाजबांधवानी देवीचे दर्शन घेत देवीला नवस केले.
पिंपळदरीच्या येडूबाई देवीची यात्रा उत्साहात
अकोल्यापासून ३२ किलोमीटरवर असणाऱ्या पिंपळदरी गावात गडावर येडूबाई देवीचे मंदिर आहे. या मंदिराची दर चैत्र पोर्णिमेच्या दुसऱया दिवशी यात्रा भरते. ३ दिवस चालणाऱ्या या उत्सवास पहाटे ४ वाजता मांडे कुटुंबीयांच्या हस्ते देवीला अभिषेक करून सुरुवात होते. या ठिकाणी ३ दिवस भील्ल समाज देवीच्या ओव्या व गाणी म्हणतात. त्यामुळे भक्तिमय वातावरण निर्माण होते.