महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"काँग्रेस-राष्ट्रवादीवाले नीट वागले नाही तर उद्धव ठाकरे राजीनामा देतील"

माजी खासदार व ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी एका कार्यक्रमात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे.

yashwantrao-gadakh-
ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख

By

Published : Jan 12, 2020, 8:40 PM IST

अहमदनगर - राज्यात राजकीय तडजोड करुन तीन पक्षांचे सरकार सत्तेवर आले. मात्र, मंत्रीपदे आणि बंगल्याच्या वाटपावरुन रोज कोणी न कोणी रुसत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनो उद्धव ठाकरेंनी जर पुढाकार घेतला नसता तर तुम्ही विरोधी पक्षातच बसले असता, असे खडेबोल माजी खासदार व ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी सुनावले आहेत. तसेच त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला सावधानतेचा इशारा पण दिला आहे.

"काँग्रेस-राष्ट्रवादीवाले नीट वागले नाही तर उद्धव ठाकरे राजीनामा देतील"

हेही वाचा - 'मला राज्यसभेवर जाण्यात काहीच रस नाही'

एका कार्यक्रमात बाळासाहेब थोरात आणि गडाख एकत्र आले होते. यावेळी गडाख यांनी थोरातांना प्रश्न विचारला, 'हे सरकार टिकलं का?' तर ते म्हणाले, 'प्रयोग केला आहे खरा पाहू काय होतयं पुढे' यावर उत्तर म्हणून गडाख म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीवाले नीट वागले नाही तर उद्धव ठाकरे राजीनामा देतील.

गडाख म्हणाले, आमदारांनी लोकांमध्ये जाऊन राहिले पाहिजे. उगाचच बंगल्यावरुन वाद कशासाठी घालत आहेत. उद्धव ठाकरे यांना मी खूप दिवसांपासून ओळखत आहे. त्यांचा सक्रिय राजकारणाचा पिंड नाही. तो एक कलाकार माणूस असून, इतरांनी कुरघोड्या करू नयेत. अशाप्रकारे गडाख यांनी सहकारी पक्षांना सुनावले.

हेही वाचा - 'माझ्यावरचे आरोप हास्यास्पद; राजकारणात काम नसल्याने खडसेंकडून नसते उद्योग'

ABOUT THE AUTHOR

...view details