अहमदनगर- कर्जतचा कुस्ती आखाडा हा राज्यातील प्रसिद्ध आखाडा म्हणून ओळखला जातो. या आखाड्यात राज्यासह देशातील तसेच कर्जत व जामखेड मधील 200 पेक्षा जास्त मल्ल सहभागी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी दिली.
कर्जतमध्ये रंगला कुस्त्यांचा फड; स्पर्धेत राज्यासह देशातील नामवंत मल्लांचा समावेश
या अगोदर सृजनच्या माध्यमातून कर्जत येथे क्रिकेट, कबड्डी, बास्केटबॉल आदी प्रकारच्या भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. परंतु कुस्ती स्पर्धा ही प्रथमच भरवण्यात आली आहे.
सृजन संस्था आयोजित भव्य कुस्ती स्पर्धा २०१९ चा उद्घाटन समारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. कर्जतच्या दादा पाटील महाविद्यालया समोरील मैदानावर ही कुस्ती स्पर्धा संपन्न होत आहे. या अगोदर सृजनच्या माध्यमातून कर्जत येथे क्रिकेट, कबड्डी, बास्केटबॉल आदी प्रकारच्या भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. परंतु कुस्ती स्पर्धा ही प्रथमच भरवण्यात आली आहे. रोहित पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले.
कर्जत येथील भव्य कुस्ती आखाड्यामध्ये राज्यातील व देशातील अनेक नामांकित मल्ल उपस्थित राहणार आहेत. यावेळी भारत विरुद्ध इराण, महाराष्ट्र विरुद्ध पंजाब ,अशा एकापेक्षा एक कुस्त्या पाहण्याची सुवर्णसंधी कुस्ती शौकीनांना मिळणार आहे. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या कुस्त्या पाहण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. या कुस्ती आखाड्याचे सूत्रसंचालन प्रसिद्ध सूत्र संचालन शंकर पुजारी हे करत आहेत.