अहमदनगर -आमदार-खासदार आणि नामदार होण्यापेक्षा वेद्यकीय क्षेत्रात काम करा, आमदार खासदारांना शिव्याही पडतात, हे सुजय विखेंनाही आता समजत असेल. तसेच वैद्यकीय क्षेत्रात काम करत राहील्यास पुढच्या दहा पिढ्या तुमच्या चांगल्या तयारी होतील, असा सल्ला आज राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी राजकारण्यांना दिला आहे. प्रवरा ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाचे भूमीपूजन व डॉ.बाळासाहेब विखे पाटील रिसर्च फाउंडेशनचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते लोणी येथे झाले. यावेळी ते बोलत होते.
काय म्हणाले राज्यपाल? -
उपचारासाठी अलोपॅथीचे आरोग्य क्षेत्रात महत्त्व आहे. त्याचप्रमाणे आयुर्वेद व योगा महत्त्वाचा आहे. आयुर्वेद हा सर्वात जूना वेद आहे. आज आरोग्य क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाने भरारी घेतली आहे. तरी सुद्धा आज आपण आपल्या परंपरेत असलेल्या आयुर्वेदाकडे वळत आहोत. चरकसंहितेमध्ये 'गोड खा, कमी खा व परिश्रमाचे खा' ही जीवनशैली नमूद केली आहे. असे नमूद करून राज्यपाल कोश्यारी म्हणाले. आयुर्वेदाचे महत्त्व ओळखत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र 'आयुष्य मंत्रालय' स्थापन केले आहे. स्वस्त किंमतीत सर्वसामान्य लोकांना औषधी मिळाल्या पाहिजेत. यासाठी देशभरात 'जन औषधी केंद्र' स्थापन झालेले आहेत. योगाचा प्रचार-प्रसारांवर त्यांचा भर राहिलेला आहे. २१ जून हा योग दिन म्हणून आपण देशभर साजरा करत आहोत, असेही ते म्हणाले.
हेही वाचा -मुंबई पोलीस करणार समीर वानखेडेंची चौकशी; चार तपास अधिकाऱ्यांचे नावे जाहीर