अहमदनगर -शिर्डीकडे निघालेल्या तृप्ती देसाई यांना पोलिसांनी नगर जिल्ह्याच्या सीमेवरच ताब्यात घेतले आले होते. देसाई यांचे आंदोलन मोडून काढण्यासाठी शिर्डीतही मोठ्या संख्येने महिला व कार्यकर्ते जमा झाले होते. देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजताच साईनगरीत काल फटाके फोडून व एकमेकींना पेढे भरवून विजयोत्सव साजरा करण्यात आला आहे.
देसाई यांच्या आक्षेपावर शिर्डीत तिव्र प्रतिक्रीया-
साई दर्शनासाठी सभ्य पेहराव करून येण्याचे आवाहन साई संस्थानने फलकाद्वारे केले होते. या निर्णयाचे भाविकांनी उत्स्फुर्त स्वागत केले असतांनाच तृप्ती देसाई यांनी मात्र संस्थानच्या निर्णयावर आक्षेप घेतला होता. संस्थानला मंदीरातील अर्धनग्न पुजारी कसे चालतात, असा प्रश्नही देसाई यांनी उपस्थीत केला होता. संस्थानने फलक हटवले नाही तर १० डिसेंबरला येवून फलक काढून टाकण्याची धमकीही तृप्ती देसाई यांनी दिली होती. देसाई यांच्या आक्षेप व विधानावर शिर्डीत तिव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. येथील शिवसेना, भाजप, मनसे महिला आघाडी तसेच ब्राह्मण महासंघाने देसाई यांना शिर्डीत येवून फलक काढूनच दाखवावा, असे प्रतिआव्हान दिले होते. प्रसंगी तोंडाला काळे फासण्याचा व चांगला धडा शिकवण्याचा इशाराही देण्यात आला होता.
शिर्डीत महिलांनी साजरा केला विजयोत्सव -