अहमदनगर - आज जगभरात 'जागतिक महिला' दिन उत्साहात साजरा होत आहे. जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये महिला दिन जरा वेगळ्याच पद्धतीने साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय पॅराग्लायडर आप्पासाहेब ढुस यांनी श्रीरामपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांना पॅरामोटरच्या साहाय्याने हवाई सफर घडवून आणली. १ हजार फुटापेक्षा जास्त उंचावर ही सफर घडवून आप्पासाहेब ढुस यांनी महिला दिन वेगळ्या पद्धतीने साजरा केला.
श्रीरामपूरमध्ये महिला दिन उत्साहात साजरा, पॅरामोटरच्या साहाय्याने केला हवाई प्रवास - APPASAHEB
जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये महिला दिन जरा वेगळ्याच पद्धतीने साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय पॅराग्लायडर आप्पासाहेब ढुस यांनी श्रीरामपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांना पॅरामोटरच्या साहाय्याने हवाई सफर घडवून आणली
पॅरामोटरच्या साहाय्याने हवाई सफर
राहुरी येथील नॅशनल अॅडव्हेंचर फाऊंडेशनच्या वतीने नेहमी पॅरामोटरच्या साहाय्याने हवाई सफर केली जाते. गेल्या काही वर्षांपासून वाढदिवस, महिला दिन, अपंग दिन असे सगळेच दिवस आप्पासाहेब ढुस यांचे फाऊंडेशन साजरे करत आहे. आजही महिला दिनानिमित्त त्यांनी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांना हवाई सफर घडवून आणून आप्पासाहेब ढुस यांनी वेगळ्या पद्धतीने महिला दिन साजरा केला.