अहमदनगर -कोतवाली पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विकास वाघ यांच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यातच लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक विकास पसार झाला आहे.
विकास वाघ हा कोतवाली पोलीस ठाण्याचा निरीक्षक म्हणून कार्यरत होता. त्यावेळी पीडित महिला तक्रार देण्यासाठी आली असता वाघ याने या महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि लग्नाचे अमिष दाखवून लैंगिक अत्याचार केला. या लैंगिक छळामध्ये महिला गरोदर राहिली होती. त्यानंतर तीला मारहाण करीत तिचा गर्भपात केल्याचे पीडिताने फिर्यादीत म्हटलं आहे.