महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बिबट्याला पाहून हृदयविकाराचा झटक्याने महिलेचा मृत्यू; कुटुंबीयांची मदतीची मागणी

शीलाबाई पानसरे या शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान आपल्या शेतामध्ये काम करत होत्या. यावेळी त्यांच्यासमोर अचानक बिबट्या प्रकट झाला. समोर उभा ठाकलेल्या बिबट्याला पाहिल्यानंतर शीलाबाई यांची पाचावर धारण बसली. त्यांनी जवळ असलेल्या इतरांना मोठ्याने आवाज दिला. याचवेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्या तिथेच कोसळल्या.

मृत शीलाबाई लहानु पानसरे
मृत शीलाबाई लहानु पानसरे

By

Published : Jan 30, 2020, 2:15 PM IST

अहमदनगर - गावात जनावरांसाठी चारा घेत असलेल्या महिलेसमोर अचानकपणे बिबट्या आल्याने घाबरलेल्या महिलेचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. शीलाबाई लहानू पानसरे (रा. जाखुरी, ता. संगमनेर) असे मृत महिलेचे नाव आहे. शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी मृत महिलेच्या कुटुंबीयांनी केली आहे.

बिबट्याला पाहून हृदयविकाराचा झटक्याने महिलेचा मृत्यू; कुटुंबीयांची मदतीची मागणी

शीलाबाई पानसरे या शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान आपल्या शेतामध्ये काम करत होत्या. यावेळी त्यांच्यासमोर अचानक बिबट्या प्रकट झाला. समोर उभा ठाकलेल्या बिबट्याला पाहिल्यानंतर शीलाबाई यांची पाचावर धारण बसली. त्यांनी जवळ असलेल्या इतरांना मोठ्याने आवाज दिला. याचवेळी त्यांना हृद्यविकाराचा झटका आल्याने त्या तिथेच कोसळल्या. मात्र, त्यांच्या आवाजाने आणि आसपासच्या लोकांचा झालेला गोंधळामुळे बिबट्या पळाला.

हेही वाचा -धक्कादायक! बीड जिल्हा रुग्णालयात सलाईनमध्ये आढळले 'शेवाळ'

यानंतर स्थानिकांनी घडलेल्या प्रकाराची माहिती तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. मृत शीलाबाई पानसरे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. तर शवविच्छेदनाच्या अहवालातही त्यांना हृद्यविकाराचा झटका आल्याचे निदान झाले. दरम्यान, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला तरच वनविभागाकडून मदत मिळते. मृत शीलाबाई यांना कोणतीही जखम झाली नाही. यामुळे मदत मिळणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, हल्ला झाला नसला तरी बिबट्याच्या रोजच्या वावराने त्रस्त झालेल्या पानसरे कुटुंबीयांनी शासनाने मदत करावी, अशी मागणी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details