अदमदनगर - विहीरीवर पाणी आणण्यासाठी गेलल्या शेतकरी महिलेचा तुटलेल्या विजेच्या तारेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. भिमाबाई भगवान गर्ज असे मृत महिलेचे नाव असून त्या पाथर्डी तालुक्यातील जांभळी गावच्या रहिवासी होत्या. विद्युत महामंडळाच्या गलथान कारभार आणि बेजबाबदारीमुळे भिमाबाईंचा मृत्यु झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
अहमदनगर : तुटलेल्या विजेच्या तारेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू हेही वाचा -जामखेडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला अटक
शासनाने मुख्यमंत्री सहायता निधीतुन भिमाबाई यांच्या कुटुंबियांना मदत देण्याची मागणी जांभळी गावातील सामाजिक कार्यकर्ते किरण सिरसाट यांनी केली आहे. शासनाच्या माध्यमातुन आणि विद्युत महामंडळकडुन तातडीची वीस हजाराची मदत भिमाबाईंच्या कुटुंबियांना दिली असुन विद्युत अभियंता यांचेकडे घटनास्थळाचा अहवाल पाठवला आहे. लवकरच याबाबत जिल्हा विद्युत अभियंता घटनास्थळी पाहणी करुन अहवाल शासनाला पाठवुन मृत भिमाबाई कुटुंबियांना आर्थिक मदत केली जाईल, असे पाथर्डी विद्युत उपकेंद्र उपअभियंता प्रिया मुंडे यांनी सांगितले.
हेही वाचा -साई मंदिर परिसरातून 10 वर्षीय मुलीचे अपहरण
दरम्यान, विद्युत महामंडळाने जर वेळीच तुटलेली विजेची तार दुरूस्त केली असती तर ही घटना घडली नसती. विद्युत महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे घटना घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. भिमाबाई यांच्या अपघाती मृत्युमुळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असुन त्यांच्या पश्चात पती मुल मुली नातवंडे असा परिवार आहे.