अहमदनगर- 24 मार्चला संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन झाल्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळता अनेक वस्तुंच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली होती. मद्यविक्रीवरही बंदी घालण्यात आली होती. दरम्यान, लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्र आणि राज्य सरकारने मद्य विक्रीला काही नियमांसह परवानगी दिली आहे.
ऑरेंज झोनमधील अहमदनगर शहरासह जिल्ह्यात मद्यविक्री दुकाने आजपासून सुरू - wine selling
अहमदनगर जिल्हा ऑरेंज झोनमध्ये असल्याने जिल्हाधिकारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज मंगळवार पासून शहर आणि जिल्ह्यातील किरकोळ दारूविक्री दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे.
अहमदनगर जिल्हा ऑरेंज झोनमध्ये असल्याने जिल्हाधिकारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज मंगळवार पासून शहर आणि जिल्ह्यातील किरकोळ दारूविक्री दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. अर्थातच सोशल डिस्टंसिंग ठेवून या दारू विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. शहरात एकंदरीत चित्र पाहिले तर आज सकाळच्या सत्रामध्ये बहुतांशी दारू दुकानाबाहेर लोकांना दिलेल्या ठराविक अंतराने उभे राहून तळीराम दारूची खरेदी करत होते. या विषयीचा आढावा घेतलाय आमचे अहमदनगरचे प्रतिनिधी राजेंद्र त्रिमुखे यांनी.