अहमदनगर - नाशिक धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारल्याने ऑगस्ट महिना उलटून गेला, तरी अहमदनगर जिल्हयातील भंडारदरा, मुळा, आणि निळवंडे धरण पूर्ण क्षमतेने भरू शकलेले नाही. एकीकडे धरणे भरलेली नसताना औरंगाबाद जिल्हयातील जायकवाडी धरणात यंदा पुन्हा पाणी सोडावे लागणार का? याची टांगती तलवार निर्माण झाली आहे. मात्र, मेंढीहगीरी समीतीच्या अहवालानुसार पंधरा ऑक्टोबरपर्यंत जायकवाडी धरणाचा पाणीसाठा हा 54 टक्के झाला नाही, तर नगरच्या धरणातून पाणी सोडण्याची वेळ येवू शकते अशी शक्यता तज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
'गेल्या तीन दिवसांपुर्वी झालेल्या पावसाने सोयाबीन आणि इतर पिकांनी तग धरली'
अहमदनगर जिल्हयात धो-धो पाऊस झाला असला, तरी धरणाच्या पाणलोटात क्षेतात अपेक्षीत पाऊस न झाल्याने या वर्षी 15 ऑगस्टलाच भरणारे 11 टिएमसी क्षमतेचे भंडारदरा धरण अद्याप भरलेले नाही. सध्याच्या स्थितीत भंडारदरा धरणाचा पाणीसाठा हा 88 टक्के, तर 26 टिएमसी क्षमतेचे मुळा धरण 74 टक्के आणि 8 टिएमसी क्षमतेचे निळवंडे धरण 77 टक्के भरले आहे. मात्र, आज बघीतले तर धरणात पाण्याची तुट आहे. गेल्या तीन दिवसांपुर्वी झालेल्या पावसाने सोयाबीन आणि इतर पिकांनी तग धरला आहे. मात्र, पुन्हा पाऊस न झाल्यास या पिकांसाठी गोदावरीतून रब्बीचे आवर्तन देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. त्यास पाटबंधारे विभागाने नकार दर्शवला आहे. त्यामध्ये पाणलोट दमदार पाऊस झाला नाही. आणि 15 ऑक्टोबरपर्यंत जायकवाडी धरणातील उपयुक्त पाण्याचा साठा 54 टक्के झाला नाही. तर, तीकडे पाणी सोडण्याची वेळ येईल. त्यामुळे आपल्या पीकांचे काय होईल याची चिंता नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजच सतावू लागली आहे. त्यामुळे पाण्यासाठी पुन्हा नाशिक-नगर विरूद्ध मराठवाडा असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.
'अंशत: पाणी सोडवता येवू शकते'
जायकवाडी धरणाला नगर आणि नाशिक जिल्ह्यातून पाणी सोडण्याचा वाद हा 2005 साली झालेल्या समन्यायी पाणी वाटप काययद्या नंतर अधिकच तीव्र होण्यास सुरवात झाली आहे. यास मेंढीहगीरी समीकीचा अहवाल कारणीभूत आणि तो एकतर्फी असल्याचा नगर जिल्हातील शेतकऱ्यांचा आरोप आहे. मेंढीगीरी समीतीच्या अहवालात काही सुत्र दिलेली आहेत. त्याच्या दुसरा पर्यायानुसार 15 ऑक्टोबरपर्यंतच जायकवाडीत पुरेसा पाणीसाठा झाला नाही. तर, अंशत: पाणी सोडवता येवू शकते. मात्र, अद्याप परतीचा पाऊस बाकी असल्याने जायकवाडीत असलेली दहा टिएमसी पाण्याची तुट भरून निघू शकेल अशी आशा आहे. जर पाऊस झालाच नाही, तर नगर जिल्ह्यातील धरण आहे. मात्र, कालवे नाही अशा निळवंडे धरणातून पाच टिएमसी पाणी सोडावे लागणार असल्याचे मत, पाटपाणी अभ्यासक सतीष वैजापुरकर यांनी व्यक्त केले आहे.