अहमदनगर- राज्यात लक्षवेधी ठरलेल्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून कोण विजयी होणार ? याची उत्सुकता शिगेला लागली आहे. या निवडणुकीची उत्सुकता उमेदवारांनाही लागली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी लागणारा निकाल हा सकारात्मक असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
अहमदनगर दक्षिणेतून 'दादा' की 'भैय्या'; उत्सुकता शिगेला - दक्षिण लोकसभा मतदारसंघ
अहमदनगरमध्ये निवडणुकीची उत्सुकता उमेदवारांनाही लागली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी लागणारा निकाल हा सकारात्मक असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
एक्झिट पोल जरी युतीच्या बाजूने दिसत असले तरी प्रत्येकाचे वेगवेगळे अंदाज आहेत. आमचाही काही अंदाज आहे. जनतेसाठी अनेक चांगली कामे केलेली असल्याने लागणारा निकाल हा आघाडीसाठी अनुकूल असेल, असा आशावाद संग्राम जगताप यांनी व्यक्त केला आहे.
अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीच्या निकालांकडे अवघ्या राज्याचे लक्ष असणार आहे. डॉ. सुजय विखे, की आमदार संग्राम जगताप, अशी उत्सुकता असून सध्या तरी कोण निवडून येणार, हे छातीठोकपणे सांगण्यास कुणीही धावत नाहीत. त्यामुळेच २३ मेच्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.