महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना नियम साई संस्थानच्या अधिकाऱ्यांना नाहीत का? सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकारांचा सवाल - शिर्डी साईबाबा संस्थान बातमी

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने पत्रकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर मास्क न लावता थेट व्हीव्हीआयपींना द्वारकामाई मंदिरात प्रवेश दिल्याचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे.

Sai Sansthan
कोरोना नियमांचे उल्लंघन

By

Published : Feb 2, 2021, 3:09 PM IST

शिर्डी(अहमदनगर) - कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याने पत्रकारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर मास्क न लावता थेट व्हीव्हीआयपींना द्वारकामाई मंदिरात प्रवेश दिल्याचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे या प्रकरणी साई संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांच्यावर कारवाई का नाही? असा प्रश्न आता ग्रामस्थ आणि पत्रकारांनी साई संस्थानला विचारला आहे.

व्हीआयपींना कोरोना नियम नाहीत का?

साईबाबांच्या द्वारकामाई मंदिरातील एका फोटोत कोरोना नियमांना धाब्यावर बसवून मास्क न लावल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हीआयपी भाविकास द्वारकामाईच्या गाभार्‍यात थेट प्रवेश दिला हे स्पष्ट झाल्यानंतर आता साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उप मुख्यकार्यकारी अधिकार्‍यांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार का? असा सवाल ग्रामस्थ आणि शिर्डी पत्रकार संघाने उपस्थित केला आहे.

16 नोव्हेंबर 2020 रोजी राज्य शासनाच्या आदेशाने कोरोनाच्या मार्गदर्शक सूचना आणि नियमांचे पालन करत शिर्डीचे साई मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. साई समाधी मंदिर तथा मंदिर परिसरात विना मास्क प्रवेश करण्यास प्रतिबंधित केल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले होते. असे असताना मागील काही दिवसांपासून दस्तुरखुद्द संस्थानचे वरिष्ठ अधिकारीच मंदिर परिसरात शासनाच्या नियमांची पायमल्ली करताना दिसत होते.

सामान्य भाविकांना, शिर्डीकरांना कोरोना नियमावलीचा प्रचंड धाक आहे, मग संस्थान अधिकार्‍यांना आणि त्यांच्या अतिथींना शासनाची नियमावली नाही का ? मुख्यमंत्री महोदयांनी अशा अधिकार्‍यांना मास्क न घालण्याची विशेष परवानगी दिली का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्याप्रमाणे पत्रकारांवर कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करून गुन्हे दाखल केले जातात. त्याप्रमाणे आता या अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करणार का हाच प्रश्न सर्वसामान्य माणसांना पडला आहे.

सध्या सोशल मीडियावर द्वारकामाई मंदिरातील एका फोटोत मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यातील एका फोटोत साई संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे व्हीआयपीचा सत्कार करताना दिसत असून विशेष म्हणजे यात त्या भाविकासह ठाकरे यांनी मास्क लावलेला नाही. कोविडच्या पार्श्वभूमीवर मास्क घालणे अनिवार्य असताना त्यांनी हा नियम पायदळी तुडवला आहे. यदाकदाचित यातील एखादा भाविक संक्रमित असेल तर कोरोनाचा संसर्ग वाढायला वेळ लागणार नाही. त्यामुळे शासनाने याची दखल घेणे गरजेचे आहे. सदर भाविकाने चक्क समाधी मंदिरात मास्क वापरलेला नसल्याने समाधी मंदिरात विनामास्क असणे म्हणजे येथील सुरक्षा रक्षक, पुजारी, स्वच्छता कामगार यांच्या आरोग्य धोक्यात आले आहे का? अलिकडे शिर्डी ग्रामस्थांना मंदिर प्रवेशासाठी नियमावली तयार होवून उच्च न्यायालयात दाखल झाली असताना दुसरीकडे अशा पद्धतीने मर्जीतील भाविकांना पायघड्या का घातल्या जातात? असा प्रश्न शिर्डी ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details