अहमदनगर :अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील प्रतीक पवार याने नुपूर शर्मांच्या (Nupur Sharma) संदर्भात टाकलेल्या पोस्टमुळे त्याचावर हल्ला झाला असल्याचे, यावेळी नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले आहे. त्याला लक्ष्य करण्यात आले असुनच पोलिसांना याचा योग्य तपास करावा लागेल. पोलिसांकडून खोट्या कहाण्या रचल्या जात आहेत. हल्लेखोरांचे जिहादी कनेक्शन पोलिसांनी तपासावे. तसे न करता पोलीस, प्रतीक पवारच गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे भासवित आहे. पोलिसांनी दबावात काम करू नये. कोणीही पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये. 'हिंदूंना अशा पद्धतीने लक्ष केले जात असेल (if Hindus are being targeted), तर आम्ही शांत बसणारे नाहीत',(We will not sit idly) असेही यावेळी नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी सांगितले.
कर्जत येथील प्रतीक पवार या व्यक्तीवर गेल्या तीन दिवांसापूर्वी जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणी अहमदनगर पोलिसांनी 14 जणांना ताब्यात घेतले आहे. हा हल्ला प्रतीक पवारने नुपूर शर्माचे समर्थन केल्यामुळेच झाला. असा आरोप करत, भाजपचे आमदार नितेश राणे आणि गोपीचंद पडळकर यांनी आज अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेतली. अहमदनगर जिल्ह्यात अल्पसंख्यांक मंत्री पालकमंत्री म्हणून नाहीत. राज्यातही महाविकास आघाडीचे सरकार नाही. त्यामुळे दबावात काम करू नका. अहमदनगर जिल्ह्यात नुपूर शर्मांच्या नावाखाली एका युवकावर हल्ला झाला. या युवकाबरोबर हल्लेखोरांची सोशल मीडियावर चर्चा झाली होती. त्याचे पुरावेही आहेत. तरीही हा प्रकार पूर्ववैमनस्यातून झाल्याचे दर्शविले जात आहे. हे चुकीचे आहे. पोलीस निरीक्षकांनी गुन्हा नुपूर शर्मा प्रकरणातून झालेला असल्याचे सांगितले असतांना, पोलीस प्रकरण दडपत असल्याचा आरोप राणे यांनी यावेळी केला आहे.