शिर्डी : आम्ही मातोश्री वर दावा केलेला नाही आणि करणार पण नाही.आम्हाला कोणत्याती प्रॉपर्टी आणि संपत्तीचा मोह नाही. लोकशाहीत मिरीट वर निर्णय होत असतात. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय मिरीटवर दिलेला आहे त्याच आम्ही स्वागत केलय असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहे.
संजय राऊंतांना कामातुन उत्तर देणार : संजय राऊंतावर मी काय बोलणार. ते कोणा कोणावर आरोप करतात, न्याय व्यवस्थेवर, निवडणूक आयोगावर आम्हाला त्याच्यावर उत्तर देण्याची आवश्यक्ता वाटत नाही. आरोपाला कामाने उत्तर देवू. यामध्ये गृह विभाग सखोल चौकशी करेन असे खोटे नाटे आरोप कुणाला ही करता येणार नाही. कायद्या सुवस्था राखण्याच काम आमचे आहे. आम्ही दुजाभाव केलेली नाही असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर येथिल लोणी येथे आयोजित महसूल परिषदेच्या उद्धघाटन प्रसंगी बोलत होते. लोणीत दोन दिवसीय राज्य स्तरीय महसूल परिषदचे आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
महसूल विभागात बदल : महसूल विभाग काळानुरूप आपली यंत्रणा बदलत असून आधुनिक साधनांचा वापर करून नागरिकांना सेवा पुरवत आहे. महसूल विभाग अधिक लोकाभिमुख करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. राज्याच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महसूल विभागाच्या बळकटीकरणासाठी शासन सदैव सकारात्मक राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य महसूल परिषदेला दिली.
महसूल परिषदेचे उद्घाटन :राज्य शासनाच्या महसूल, वन विभागाच्या वतीने लोणी येथे आयोजित राज्यस्तरीय महसूल परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी महसूल अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, महसूलचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
जनतेच्या हिताचे सर्वाधिक निर्णय :यावेळी बोलतांना शिंदे म्हणाले की, गेल्या सहा महिन्यांत महसूल विभागाने जनतेच्या हिताचे सर्वाधिक निर्णय घेतले आहेत. शासनाचे निर्णय राज्यातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्याचे काम या विभागामार्फत केले जाते. या विभागाचा राज्याच्या महसुलात 25 टक्के वाटा आहे. महाराजस्व मोहीम, ई-प्रॉपर्टी कार्ड, ऑनलाइन 4 लाख फेरफार ऑनलाईन करणे, ड्रोनद्वारे जमिनीचे सर्वेक्षण, डिजिटलायझेशन यांसारखे अत्याधुनिक प्रकल्प सर्वसामान्यांच्या हितासाठी राबविल्याबद्दल त्यांनी विभागातील सर्व अधिकाऱ्यांचे कौतुक केले.