अहमदनगर- येथील पाणलोट क्षेत्रातील नालाबंडिंगची कामे नव्या पद्धतीने व्हावीत यासाठी प्लास्टिकच्या वापराची पद्धती अंमलात यावी, अशी संकल्पना ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी मांडली आहे. यासाठी जलसंधारण विभागाच्या सचिवांसोबत त्याची चर्चा झाली. त्यांनी या संकल्पनेला प्रायोगिक पद्धतीसाठी संमती दिली आहे. त्यानंतर या पद्धतीचा पहिला प्रयोग राळेगणसिद्धीतील सहा पाणलोट क्षेत्राच्या नालाबंडिंगमध्ये सुरू करण्यात आला आहे.
...तर राळेगणसिद्धीतील प्लास्टिकयुक्त नाला-बंडीगचा प्रयोग राज्यभरात राबवला जाणार - वाटरप्रूफ प्लास्टिक बातमी
पाणलोट क्षेत्रातील नालाबंडींगची कामे नव्या पद्धतीने व्हावीत यासाठी वाटरप्रूफ प्लास्टिकच्या वापराची पद्धती अंमलात यावी, अशी संकल्पना जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी मांडली आहे.
सध्या पाणलोट क्षेत्रातील नालाबंडींग खोदण्याचे काम सुरू असून त्यात वाटरप्रूफ प्लास्टिक अंथरण्याचे काम होत आहे. गावागावातील पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत झालेली नालाबंडिंगची कामे ही अतांत्रिक पद्धतीने झाली. त्यामुळे हजारो-लाखोंचा निधी वाया गेला आहे. तसेच या कामातून जलसंधारणाचे अपेक्षित उद्दिष्ट कुठेही पूर्ण होताना दिसून आलेले नाही. त्यामुळे आण्णांच्या संकल्पनेतील पद्धतीनुसार जलसंधारणाचा प्रयोग यशस्वी झाल्यास त्याचा शासनस्तरावर राज्यभर अंमल होणार आहे.