महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साई समाधी मंदिरातील तळघरात पाण्याचे पाट!

शिर्डीतील साईबाबा मंदिरात समाधीच्या डाव्या बाजूच्या दर्शनरांगेत तळघरात जाणार दरवाजा आहे. त्याच तळघरात सध्या पाणी झिरपत असून तळघरात साठलेले पाणी मोटारीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात येत आहे.

Sai Temple
साई समाधी मंदिरातील तळघरात पाण्याचे

By

Published : Aug 2, 2020, 2:37 PM IST

शिर्डी -साई मंदिरातील साईबाबांच्या समाधीलगत असलेल्या तळघरात गेल्या काही दिवसापासून पाणी झिरपत असल्याचा प्रकार समोर आला आहे. ही पाणी गळती बंद करण्यासाठी केमिकलचा वापर करण्यात आला. मात्र, पुन्हा अन्य एका ठिकाणी पाणी झिरपू लागले आहे. तळघरात साठलेले पाणी मोटारीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात येत आहे. तळघरात झिरपणारे पाणी मंदिर प्रशासनाची चिंता वाढवत आहे.

साई समाधी मंदिरातील तळघरात पाणी

शिर्डीतील साईबाबा समाधी मंदिरात समाधीच्या डाव्या बाजूच्या दर्शनरांगेत तळघरात जाणार दरवाजा आहे. त्याच तळघरात सध्या पाणी झिरपत आहे. या तळघरात साईमूर्तीची दैनंदिन वापराची आभूषणे आणि पूजेच्या मौल्यवान वस्तू ठेवलेल्या असतात. हे पाणी नेमके कोठून येते याचा शोध अद्याप लागला नाही. गेल्या काही दिवसात सतत पाऊस पडत असल्याने जमिनीत मुरलेले पाणी या ठिकाणी पाझरत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तळघरात मंदिराच्या महत्त्वाच्या वस्तू असल्याने झिरपणारे पाणी बंद करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details