महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिर्डीमध्ये जलसंकट; कोपरगावला 12 दिवसाआड पाणी पुरवठा - शिर्डी

अहमदनगर उत्तर जिल्ह्यामध्ये प्रंचड पाणीटंचाई असल्यामुळे नागिरकांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन फिरण्याची वेळ आली आहे.

शिर्डीमध्ये जलसंकट; कोपरगावला 12 दिवसाआड पाणी पुरवठा

By

Published : May 27, 2019, 6:36 PM IST

अहमदनगर- अहमदनगर उत्तर जिल्ह्यामध्ये प्रंचड पाणीटंचाई असल्यामुळे नागिरकांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन फिरण्याची वेळ आली आहे. जिल्ह्याच्या उत्तर भागातील 6 तालुक्याच्या ठिकाणासह ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.

भंडारदरा आणि निळवंडे धरणात पाणीसाठा अत्यल्प राहिला आहे. त्यामुळे जून महिन्यात पाण्याचे एकच रोटेशन होणार असल्याचे माहिती कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली. सध्या दोन्ही धरणात जूनपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील पाण्याची स्थिती

  • 1 ) राहाता - तालुक्यातील ग्रामीण भागात शासनाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. शिर्डी, राहाता लोणी या शहरांना 1 दिवसाआड नगरपालिकेच्या वतीने पाणीपुरवठा केला जातो.
  • 2 ) कोपरगाव - गोदावरी नदीकाठी वसलेल्या कोपरगाव शहराला गेल्या काही महिन्यांपासून नगरपालिकेकडून 17 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात होता. मात्र, शहरातील नागरिकांनी यासाठी मोठे आंदोलन केल्यानंतर 17 दिवसानंतर आता 12 दिवसांनी पाणी पुरवठा केला जात आहे. त्याबरोबरच येथील ग्रामीण भागातही शासनाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.
  • 3 ) संगमनेर - तालुक्यातील पठार भागात पिण्याच्या पाण्याची बिकट परस्थिती निर्माण झाली आहे. शासनाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असला तरी, नागरिकांना पाण्यासाठी वनवन फिरावे लागत आहे. संगमनेर शहरात मात्र नगरपालिकेकडून दररोज 40 मिनटे पाणी पुरवठा केला जात आहे.
  • 4 ) अकोले - भंडारदरा-निळवंडे या धरणाच्या कुशीत हा तालुका वसला असला तरी या ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवत आहे. अकोले शहराला 1 दिवसाआड पाणी पुरवठा होत असून ग्रामीण भागात शासनाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.
  • 5 ) श्रीरामपूर - तालुक्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाई जाणवत आहे. तर श्रीरामपूर शहराला दररोज नगरपालिकेकडून पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच काही भागात टँकरद्वारेही शासनाकडून पाणी पुरवठा केला जात आहे.
  • 6 ) नेवासा - तालुक्यातील ग्रामीण भागात शासनाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. तर नेवासा शहराला 4 दिवसाआड नगरपालिकेकडून पाणी पुरवठा होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details