महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगर शहर : मुळा धरणातील पाणी फक्त पिण्यासाठी राखीव; १५ जुलैपर्यंत अडचण नाही - धरण

येत्या १५ जुलैपर्यंत नगर शहरासह इतर सर्व पाणी पुरवठा योजनांना नियमित पाणी उपलब्ध होणार असल्याची माहिती मुळा धरणाचे शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी दिली आहे.

मुळा धरण

By

Published : May 27, 2019, 5:03 PM IST

अहमदनगर-शहरासह अनेक गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या मुळा धरणात ५ हजार ३५० दलघफु इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. सध्य स्थितीत उपलब्ध पाणीसाठा फक्त पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. येत्या १५ जुलैपर्यंत नगर शहरासह इतर सर्व पाणी पुरवठा योजनांना नियमित पाणी उपलब्ध होणार असल्याची माहिती मुळा धरणाचे शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी दिली आहे.

मुळा धरण

अहमदनगर महानगरपालिकेचे विद्युत आणि पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अभियंता परिमल निकम यांनी सांगितले की, मुळा धरणात पाण्याची पातळी ही १,७५६.४५ फूट इतकी असून १,७५२ फूट पातळी असेपर्यंत पाणी पुरवठ्या बाबत कुठलीही अडचण नसते. आतापर्यंत ३० जूनच्या आतच नवीन पाण्याची आवक धरणात आल्याने शहराला पाणी पुरवठ्याची अडचण यंदाही येणार नसल्याची आशा निकम यांनी व्यक्त केली आहे.

पाणी काटकसरीने वापरा- मनपा

शहराला रोज २.५ दलघफु इतके पाणी उपलब्ध केले जाते. महानगरपालिका हद्दीत जवळपास ५२ हजार पाणी नळजोडणी दिलेली आहे. दोन साठवण टाक्यांमधून पुढे इतर सतरा टाक्यांच्या माध्यमातून सर्व नळजोड दिलेले आहेत. मात्र, दुष्काळी परिस्थिती आणि १० जून नंतर मान्सूनच्या उशिराच्या आगमनाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून आणि काटकसरीने वापरावे, असे आवाहन मनपाच्या वतीने परिमल निकम यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details