अहमदनगर - कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता शिर्डी साईबाबा संस्थानने व्हीव्हीआयपी पासेस बंद केले आहेत. साईबाबांच्या मंदिरात होणारी गर्दी कमी व्हावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला. साईबाबांच्या समाधीला भाविकांनी हात न लावत दुरूनच दर्शन घेण्याची सूचना देण्यात आली आहे, यासाठी गाभाऱ्याच्यासमोर काचही लावली आहे.
साईबाबांच्या मंदिरात व्हीव्हीआयपी पासेस बंद; मंदिर प्रशासनाचा निर्णय - शिर्डी साईबाबा संस्थान
कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता शिर्डी साईबाबा संस्थानने व्हीव्हीआयपी पासेस बंद केले आहेत. साईबाबांच्या मंदिरात होणारी गर्दी कमी व्हावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला. ज्या भक्तांनी यापूर्वी ऑनलाईन पासेस घेतले असतील, त्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.

हेही वाचा -मंत्रालयात आढळला कोरोनाचा संशयित रुग्ण; कस्तुरबा रुग्णालयात चाचणीसाठी दाखल
मंगळवारी रात्रीच्या आरतीपासून साई संस्थानच्या जनसंपर्क विभागामार्फत देण्यात येणारी सशुल्क व्हिव्हिआयपी पासेस सेवा बंद करण्यात येणार आहेत. साई मंदिरात दररोज चार आरत्या होत असतात, त्यावेळी मंदिरात अर्धा तास भाविकांना थांबवले जाते. यावेळी गाभाऱ्यात प्रामुख्याने व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी लोकांचाच जास्त भरणा असतो. ज्या भक्तांनी यापूर्वी ऑनलाईन पासेस घेतले असतील, त्यांना प्रवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थानचे विश्वस्त बिपीन कोल्हे यांनी दिली.