शिर्डी - कोपरगाव शहरातील ( Kopargaon City ) असाच मानवाला धडा देणारा प्राण्यांचा व्हिडीओ सध्या व्हायरल ( Viral video ) होत आहे. एकमेकांचे हाडवैरी म्हणून ओळख असलेल्या श्वानाच्या पिलांसाठी ( Dog Puppies ) डुकरीणीनं आपलं मातृत्व बहाल केलं आहे. शहरातील राजस्थान स्वीट नजीक हा अनोखा प्रकार पाहवयास मिळाला आहे. कोपरगाव शहातील टाकळी रोडवरील गोदावरी पेट्रोल पंपालगत काही दिवसांपूर्वी एका श्वानाला चार-पाच पिल्लं झाली. गोंडस पिलांना जन्म दिल्यानंतर श्वान अचानक दगावले. आई गेल्यानं जगात आलेली तान्ही पिल्लं आईची माया, दुधासाठी पोरकी झाली.
डुकरीण आईने घेतली पिल्लांची जबाबदारी - भूकेनं व्याकूळ झालेली पिल्ल पडतझडत आईच्या दुधासाठी तरसू लागली. अशातचं या अनाथ पिल्लासाठी डुकरीण आईचं ( pig mother ) प्रेम तसेच दूध देवू केलं. जणू एका डुकरीणीला देवानेच या पिल्लाच्या संगोपानाची जबाबदारी देत आई बनून पाठवले. डुकरीणीन चक्क त्या पिल्लांना आपले दूध पाजण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे भूक लागली की कुत्र्याची पिल्ल लुटूलुटू पळत जावून डुकरीणीला पिऊ लागतात. आईत्व प्राप्त झालेली वराह माता देखिल त्यांना आपल्या पोटच्या पिल्लां प्रमाणे दुध पाजत आहे.