महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोपरगावमध्ये भाजपच्या स्नेहलता कोल्हेंकडून आचारसंहितेचा भंग

आचार संहिता जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांचे फलक हटवण्यात येतात. जे हलवता येत नाहीत. ते झाकून टाकतात. मात्र, कोपरगाव तालुक्यातील संवत्सर आणि भोजडे ग्रामपंचायत हद्दीतील बस स्थानकावर पक्षाचे चिन्ह आणि लोकप्रतीनीधींची फोटो अद्यापही झळकत आहे.

By

Published : Sep 22, 2019, 5:12 PM IST

स्नेहलता कोल्हेंकडून आचारसंहितेचा भंग

अहमदनगर- विधानसभेची निवडणूक जाहीर होताच आचार संहिताही जाहीर झाली. मात्र, या अचार संहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी निवडणुक अधिकारी आणि राजकीय पक्षांकडुन होत नसल्याचे समोर आले आहे.

भाजपच्या स्नेहलता कोल्हेंकडून आचारसंहितेचा भंग

हेही वाचा - निवडणूक जाहीर होताच भाजप-सेनेला गळती सुरु

आचार संहिता जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांचे फलक हटवण्यात येतात. जे हलवता येत नाहीत. ते झाकून टाकतात. मात्र, कोपरगाव तालुक्यातील संवत्सर आणि भोजडे ग्रामपंचायत हद्दीतील बस स्थानकावर पक्षाचे चिन्ह आणि लोकप्रतीनीधींची फोटो अद्यापही झळकत आहे. त्यामुळे या विरोधात कारवाई करण्याची मागणी समाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केली आहे.

हेही वाचा - समाजस्वास्थ बिघडवणाऱ्या भाजपला 'चले जाव' म्हणायची वेळ - शरद पवार

कोपरगावच्या लोकप्रतिनिधी स्नेहलता कोल्हे यांनी तालुक्यात आपल्या स्थानिक विकास निधीतून गावा-गावात बस स्थानकांवर बस शेड उभे केले आहेत. त्यावर भारतीय जनता पक्षाचे चिन्ह आणि प्रतिनिधींचे फोटो लावले आहेत. आचार संहिता जाहीर झाल्यानंतरही हे अद्याप हटवले नाहीत. तसेच या फलकांवर काही टाकून झाकलेही नाहीत. त्यामुळे आचार संहितेचा भंग झाल्याचे कोपरगावातील समाजिक कार्यकर्ते काळे यांनी शासनाच्या निदर्शनास आणून देवुन त्यावर कारवाई झाली नसल्याचे सांगतिले.

ABOUT THE AUTHOR

...view details