अहमदनगर - समन्यायी पाणी वाटपाचा कायदा मांडणारे, अहमदनगरमधील पाण्याची वाट लावणारे आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले, अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरातांवर केली. मात्र, त्यांचे काय करायचे आहे हे आपण बघून घेऊ, असा सूचक इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. जिल्ह्यातील नेवासा येथे रविवारी एका कार्यक्रमात ते बोलत होते.
'नगरमधील पाण्याची वाट लावणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, त्यांचे काय करायचे बघून घेऊ' - अहमदनगर
येत्या विधानसभेत अहमदनगर जिल्ह्यात १२ विरुद्ध ० होणार असून विधानसभेच्या सर्व जागा युती सरकार जिंकणार आहे. समोरच्यांना खाते देखील उघडू देणार नाही. पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील असा विश्वास विखेंनी यावेळी व्यक्त केला.

बाळासाहेब विखेंनी अनेक वर्षे नदी जोड प्रकल्प आणि पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी वळवण्यासाठी संघर्ष केला. त्यांची योजना भाजप सरकारने स्विकारली. मुख्यमंत्री विदर्भातील असून देखील त्यांना नगरचा पाणीप्रश्न समला. मात्र, आतापर्यंतचे सर्व नगरच्या पुढाऱ्यांना सत्ता गेली तरी कळले नाही, अशी टीकाही विखे यांनी यावेळी केली.
गेल्या ५० वर्षात झाले नाही एवढे काम गेल्या ५ वर्षामध्ये झाली. फडणवीस सरकारने किमया केली आहे. त्यामुळेच येत्या विधानसभेत अहमदनगर जिल्ह्यात १२ विरुद्ध ० होणार असून विधानसभेच्या सर्व जागा युती सरकार जिंकणार आहे. समोरच्यांना खाते देखील उघडू देणार नाही. पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील असा विश्वास विखेंनी यावेळी व्यक्त केला.