अहमदनगर- परतीच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानाचे सरसकट पंचनामे करा. शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या तर कारवाई करू, असा इशारा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिला आहे. तर शरद पवार मुख्यमंत्री झाले तर आम्हाला आनंदच होईल, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.
शरद पवार मुख्यमंत्री झाले तर आनंदच - विजय वडेट्टीवार - परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान
राहुरी येथे परतीच्या पावसाने नुसकान झालेल्या पिकांच्या पाहाणी दौऱ्यासाठी आले असताना वडेट्टीवार माध्यमांशी बोलत होते.
विजय वडेट्टीवार
राहुरी येथे परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांच्या पाहाणी दौऱ्यासाठी आले असताना वडेट्टीवार माध्यमांशी बोलत होते. यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे, प्रातांधिकारी अनिल पवार, तहसीलदार फसुद्दीन शेख, कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे, नंदकुमार गागरे, अमोल जाधव, प्रकाश देठे, सचिन ठुबे, राजेंद्र बानकर, सुनिल आडसुरेसह शेतकरी उपस्थित होते.