अहमदनगर - माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांची कोंडी करण्याच्या प्रयत्नात असलेले त्यांचे ज्येष्ठ बंधू डॉ. अशोक विखे यांनी आता उपोषणाचे हत्यार उपसले आहे. विखे कुटुंबियांच्या अधिपत्याखालील विविध संस्थांमधील काही प्रकरणांच्या चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. लोणी प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे-पाटील पुतळ्यासमोर २० मे रोजी उपोषणास बसण्याचा इशारा अशोक विखे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
विखे कुटुंबाचा वाद चव्हाट्यावर; राधाकृष्ण विखेविरूद्ध ज्येष्ठ बंधू अशोक विखे करणार उपोषण - pravranagar
विखे कुटुंबियांच्या अधिपत्याखालील विविध संस्थांमधील काही प्रकरणांच्या चौकशी करावी अशी मागणी त्यांचे ज्येष्ठ बंधू अशोक विखे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
विखे यांच्या खासगी, सहकारी आणि त्यांची सत्ता असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील काही प्रकरणांच्या चौकशीची मागणी डॉ. अशोक विखे यांनी केली आहे. विरोधी पक्षनेते विखे यांच्यासह त्यांचे चिरंजीव डॉ. सुजय आणि पत्नी शालिनी यांच्या अधिपत्याखालील संस्थांमधील प्रकरणांसंबंधी या तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन पाठवून विखे यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
प्रवरानगर, गणेश, राहुरी या कारखान्यांनी जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना उसाचे पैसे मिळावेत, झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फौंडेशनने प्रवरा मेडिकल ट्रस्टला दिलेल्या देणग्यांची चौकशी करावी, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्या जवळच्या लोकांनी टेंडर देण्याचा प्रकार होत आहे. जिल्हा परिषदेतील अनुकंपा भरतीतील गैरप्रकाराचा तपासणी समितीचा अहवाल जाहीर करून संबंधितांवर कारवाई व्हावी, जिल्हा परिषदेत २००४ ते २००९ या काळात झालेल्या शालेय पोषण आहारातील गैरप्रकाराची चौकशी करावी, मुळा प्रवरा विज संस्थेतही गेल्या दोन वर्षाचा ऑडीट रिपोर्ट नाही श्रीरामपूरच्या मुळा-प्रवरा वीज वापर संस्थेतील अपहाराची चौकशी करावी, या संस्थेला सरकारकडून मिळालेली रक्कम सभासदांच्या खात्यात जमा करावी, या मगण्यांसाठी उपोषण करण्यात येणार असल्याचे अशोक विखे यांनी सांगितले.