महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संगमनेरमध्ये बर्निंग कारचा थरार; प्रवाशांनी घेतली पेटत्या गाडीतून उडी - गाडीने पेट घेतला संगमनेर

गाडीतील वायरिंगमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्यामुळे गाडीने पेट घेतला. प्रकार लक्षात येताच गाडीच्या चालकासह इतर प्रवाशांनी गाडी रस्त्याच्या कडेला थांबवून पेटत्या गाडीतून उडी घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

संगमनेर येथे नाशिक रोडवर गाडीतील वायरींगमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्यामुळे गाडीने पेट घेतला

By

Published : Nov 15, 2019, 1:50 PM IST

अहमदनगर -संगमनेर येथे नाशिक रोडवर गाडीतील वायरिंगमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्यामुळे गाडीने पेट घेतला. प्रकार लक्षात येताच गाडीच्या चालकासह इतर प्रवाशांनी गाडी रस्त्याच्या कडेला थांबवून पेटत्या गाडीतून उडी घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

संगमनेर येथे नाशिक रोडवर गाडीतील वायरींगमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्यामुळे गाडीने पेट घेतला

हेही वाचा -चाक खड्ड्यात गेल्याने संगमनेर-कसारा बसचा अपघात; चालकाच्या सावधानतेमुळे अनर्थ टळला

हिवरगाव पाठार येथील शिवाजी कारभारी वलवे सेकंड हँड एमएच.17 व्ही 3165 गाडी खरेदी केली होती. ही गाडी दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये टाकलेली होती. मात्र, ती ताब्यात घेवून पुन्हा रस्त्यावर आणताच गाडीला आग लागली. घटनेची माहिती मिळताच संगमनेर नगर पालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळ धाव घेतली. मात्र तोपर्यंत गाडीने पूर्णपणे पेट घेतला होता. या घटनेत जीवीतहानी झाली नसली तरी वलवे यांचे मोठे नुकसान झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details