महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 28, 2020, 3:13 PM IST

ETV Bharat / state

शिर्डीतील भाजीपाला विक्री करणाऱ्या महिलेला कोरोना लागण, संपर्कातील १९ जण क्वारंटाईन

एकही रुग्ण नसलेल्या शिर्डीत कोरोनाबाधित रुग्ण सापडला आहे. बाधित महिला ही भाजीविक्रेती असून तिच्या संपर्कात आल्याने संसर्ग पसरल्याचा धोका वाढला आहे.

shirdi corona news
शिर्डीतील भाजीपाला विक्री करणाऱ्या महिलेला कोरोना लागण

शिर्डी(अहमदनगर) - निमगाव येथील 55 वर्षीय भाजीपाला विक्रेत्या महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. महसूल आणि पोलीस प्रशासनाच्यावतीने निमगाव आणि निघोज हे दोन्ही गाव सील करण्यात आले आहेत. तसेच या बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या 19 जणांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

शिर्डी जवळील निमगाव येथील 55 वर्षीय भाजीपाला विक्री करणाऱ्या महिलेला सर्दी, खोकला, घशाचा त्रास जाणवू लागल्याने अहमदनगर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या महिलेचा कोरोना अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. पोलीस आणि महसूल प्रशासनाच्यावतीने या बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या निमगाव येथील 12 जणांना तसेच शिर्डी येथे माहेरी गेलेल्या सुनेला आणि कुटुंबातील 7 जणांना जिल्हा रग्णालयात हलवण्यात आले आहे. या महिलेचा भाजीपाला व्यवसाय असल्याने या महिलेच्या संपर्कात अजून कोण कोण आले आहेत आणि ही महिला कोणाच्या संपर्कात आल्याने बाधित झाली आहे, याचा शोध प्रशासनाने सुरू केला आहे.

ही बाधित महिला गेल्या तीन दिवसांपूर्वी शिर्डी साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती. तिच्या संपर्कात आलेल्या हॉस्पिटलमधील काही कर्मचाऱ्यांना जिल्हा रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे. शिर्डीत हा पहिलाच कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details