अहमदनगर- समस्त वंजारी समाजाच्या वतीने वाढीव आरक्षणाच्या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी आज संगमनेर प्रांतकार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महिला, तरुणी, विद्यार्थ्यांसह हजारोंच्या संख्येने वंजारी समाज सहभागी झाला होता. हातात भगवे ध्वज घेऊन निघालेल्या या मोर्चाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
'मागण्या पूर्ण करा अन्यथा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकू'
दरम्यान प्रांतकार्यालयासमोर मोर्चा पोहोचल्यानंतर मोर्चाचे छोटेखानी सभेत रुपांतर झाले. वंजारी समाजाच्या विविध नेत्यांनी भाषणातून मोर्चाची भुमिका विषद केली. निवडणुकीपूर्वी मागण्या मान्य कराव्यात अन्यथा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकू असा पावित्रा, वंजारी समाजाने या मोर्च्यावेळी जाहीर केला.
दरम्यान प्रांतकार्यालयासमोर मोर्चा पोहोचल्यानंतर मोर्चाचे छोटेखानी सभेत रुपांतर झाले. वंजारी समाजाच्या विविध नेत्यांनी भाषणातून मोर्चाची भुमिका विषद केली. निवडणुकीपूर्वी मागण्या मान्य कराव्यात अन्यथा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकू, असा पावित्रा वंजारी समाजाने या मोर्चावेळी जाहीर केला. अशा आशयाचे निवेदन देखील मोर्चेकऱ्यांकडून प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आला. वंजारी समाजाच्या या आक्रामक भूमिकेमुळे सराकार समोरच्या अडचणी वाढल्या असून आरक्षण प्रश्नी सरकारकडून काय तोडगा काढला जातो हे पाहाणे आता महत्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा-सुजय विखे माफी मागा अन्यथा.. अभिनेत्री दीपाली सय्यदचा इशारा