महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी - ahmednagar rain news

पुढील काही दिवस अवकाळी पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने कळवल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

By

Published : May 15, 2020, 10:10 PM IST

अहमदनगर- शहरासह जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. काल आणि आज ढगांचा कडकडाट आणि सुसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाने हजेरी लावली आहे. पुढील काही दिवस अवकाळी पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने कळवल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

नगर, पारनेर, श्रीगोंदा, पाथर्डीसह उत्तर नगर जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने विजेचे खांब कोसळले. तसेच अनेक झाडे उन्मळून पडली. यामुळे वीज वितरण खंडित होण्याबरोबरच काही ठिकाणी वाहतूक खोळंबा झाला. रात्री उशिरापर्यंत नगर शहरात वीज खंडित होती. ग्रामीण भागात आज वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, आजही पावसाने हजेरी लावल्याने वाढलेल्या उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना हवेत गारवा निर्माण झाल्याने काहीसे हायसे वाटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details