महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साई मंदिरातील 'ड्रेस कोड'च्या फलकाला फासले काळे; भूमाता ब्रिगेडचे कृत्य - शिर्डी साई मंदिर बोर्ड

Shirdi Sai temple news
साई मंदिरातील 'ड्रेस कोड'च्या फलकाला फासले काळे; अज्ञाताचं कृत्य

By

Published : Jan 7, 2021, 6:10 PM IST

Updated : Jan 7, 2021, 7:15 PM IST

19:14 January 07

अहमदनगर : शिर्डीच्या साई मंदिरात भाविकांनी भारतीय पेहरावातच यावे अशा आशयाचा फलक लावण्यात आला होता. आज भूमाता ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी या फलकाला काळे फासल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी हर्षल पाटील, मनिषा कुंजीर आणि मीनाक्षी शिंदे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

18:05 January 07

साई मंदिरातील 'ड्रेस कोड'च्या फलकाला फासले काळे; भूमाता ब्रिगेडचे कृत्य

काही दिवसांपूर्वी करण्यात आले होते आंदोलन..

काही दिवसांपूर्वी शिर्डी संस्थानाने मंदिरात येणाऱ्या भाविकांनी केवळ भारतीय वेशभूषा करावी अशा आशयाचे आवाहन करणारे फलक लावले होते. तर, अशा प्रकारचे फलक लावणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रकार असल्याचे म्हणत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाईंनी याविरोधात आंदोलन केले होते. तसेच, ३१ डिसेंबरपर्यंत हे फलक काढून टाकावेत अशी मागणीही देसाईंनी संस्थानाकडे केली होती.

तृप्ती देसाईंवरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता..

यानंतर नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात मंदिरात भक्तांची गर्दी असल्यामुळे, त्यांना त्रास होऊ नये म्हणून देसाईंनी आंदोलनाबाबत कोणतीही घोषणा केली नव्हती. मात्र, आज भूमाता ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास या फलकांवर काळे द्रव्य फेकले. यानंतर या तीन पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तृप्ती देसाईंवरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :नीलम गोऱ्हे यांच्या विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

Last Updated : Jan 7, 2021, 7:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details