महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगर : पाथर्डीत अज्ञात विक्षिप्त तरुणाचे महिलांसोबत गैरवर्तन, परिसरात दहशत - women abuse patahdri ahmednagar news

पाथर्डी शहरात गेल्या वर्षभरापासून अनोळखी तरुण उपनगरात रात्री व पहाटेच्या वेळी व्यायामासाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांसोबत बळजबरीने लगट करतो. खिडकीतून डोकावतो, दरवाजा उघडा दिसला तर थेट घरात प्रवेश करतो. असे प्रकार वारंवार होत असल्याने महिला वर्गात या अज्ञात व्यक्तीबाबत दहशत पसरली आहे.

पाथर्डीत अज्ञात विक्षिप्त युवकाची दहशत
पाथर्डीत अज्ञात विक्षिप्त युवकाची दहशत

By

Published : Aug 27, 2020, 1:14 PM IST

Updated : Aug 27, 2020, 1:51 PM IST

अहमदनगर - शहरात गेल्या वर्षभरापासून रात्री व पहाटेच्या वेळी उपनगरात एका अज्ञात विक्षिप्त तरुणाकडून व्यायामासाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांसोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे, महिलांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून या अज्ञात व्यक्तीचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातून होत आहे.

पाथर्डीत अज्ञात विक्षिप्त तरुणाचे महिलांसोबत गैरवर्तन

पाथर्डी शहरात गेल्या वर्षभरापासून अनोळखी तरुण उपनगरात रात्री व पहाटेच्या वेळी व्यायामासाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांसोबत बळजबरीने लगट करतो. खिडकीतून डोकावतो, दरवाजा उघडा दिसला तर थेट घरात प्रवेश करतो. अंगणात वाळत घातलेले स्त्रियांचे कपडे काढून इतर ठिकाणी घरात नेऊन टाकतो. असे प्रकार वारंवार होत असल्याने महिला वर्गात या अज्ञात व्यक्तीबाबत दहशत पसरली आहे.

सहा महिन्यांपूर्वी वामनभाऊ नगर परिसरात हा तरुण एका घराच्या अंगणात आगळीक करताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून न्यायालय परिसर व रामदेव बाबा टेकडी परिसरात हा युवक नागरिकांच्या निदर्शनास आला आहे. तर, शनिवारी सायंकाळी साडे नऊ वाजता रामगिर बाबा टेकडी परिसरात या अज्ञात तरुणाने घराच्या अंगणात भांडी घासणार्‍या एका महिलेशी अशाच प्रकारचे कृत्य केले. दरम्यान, महिलेने घाबरून आरडाओरड केली. यावेळी परिसरातील जमाव संतप्त झाला व त्या अज्ञात तरुणाला पकडण्यासाठी प्रयत्न केले असता, त्याने एका नागरिकाला दगड मारून जखमी केले. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने रात्री दहा वाजल्यापासून दोन तास रास्ता रोको केला. या घटनेनंतर पाथर्डी पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी व कर्मचारी घटना ठिकाणी दाखल झाले. मात्र, या प्रकाराने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा -कोपरगावात भंगार व्यावसायिकाचा खिसा कापला; सव्वा लाख रुपयांची चोरी

Last Updated : Aug 27, 2020, 1:51 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details