महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sai Baba Sansthan साई मंदिरात फुले, हार, प्रसाद चालू करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्याचे अनोखे आंदोलन - Sai Baba Sansthan

केंद्र सरकारने कोविड काळातील सर्व निर्बंध उठवले आहेत. साई मंदिर सर्व भक्तांना खुले झाले आहे. तरीही अजून साई मंदिरात साईंच्या समाधीवर फुले वाहण्यावर साई संस्थानकडून निर्बंध लावण्यात आलेले आहेत. अजूनही फुले वाहण्यास मनाई असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे Social Activist Sanjay Kale यांनी कोपरगाव ते शिर्डी डोक्यावर फुलांची परडी घेऊन पदयात्रा करीत शिर्डीत साईबाबांच्या द्वारकामाईसमोर फुले वाहत Padayatra From Kopargaon to Shirdi साईबाबा संस्थानच्या कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या नावाने आरोळी देत फुले, प्रसाद सुरू करण्याची मागणी केली

Sai Baba Sansthan
सामाजिक कार्यकर्त्याचे अनोखे आंदोलन

By

Published : Aug 18, 2022, 1:37 PM IST

शिर्डी, अहमदनगरकोविड काळात शिर्डीच्या साईबाबा समाधीवर Sai Baba Sansthan हार, फुले अर्पण करणे बंद Still Forbidden to Carry Flowers केले होते. ते पुन्हा सुरू करण्याची मागणी शेतकरी आणि विक्रेते यांनी करूनही साई संस्थानने सकारात्मक निर्णय न घेतल्याने अखेर सामाजिक कार्यकर्ते संजय काळे Social Activist Sanjay Kale यांनी कोपरगाव ते शिर्डी डोक्यावर फुलांची परडी घेऊन पदयात्रा करीत Padayatra From Kopargaon to Shirdi शिर्डीत साईबाबांच्या द्वारकामाईसमोर फुले वाहत साईबाबा संस्थानच्या कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या नावाने आरोळी देत फुले, प्रसाद सुरू करण्याची मागणी केली आहे.


सर्व निर्बंधमुक्त केले असले तरी अजून मंदिरात हार, फुले चढवण्यास मनाई केंद्र सरकारने कोविड 19 नंतर सर्व निर्बंध उठवले आहेत. साईबाबा मंदिर भक्तांना खुले झाले आहे. कोविडपूर्वी साई मंदिरात फुलहार, प्रसाद भक्त चढवित असत. मात्र, कोविडनंतर हे बंद केले गेले. ते पुन्हा सुरू करण्याची मागणी शिर्डी परिसरातील फूल उत्पादक आणि विक्रेते यांनी साई संस्थानकडे वारंवार केली होती. मात्र, त्याबाबत निर्णय घेण्यात आला नाही, खरे तर मंदिर म्हटल की फुले चढविण्याची परंपरा चालत आली आहे. शिर्डीला येणाऱ्या भक्तांची गर्दी जशी वाढू लागली तसे शिर्डीच्या परिसरात फुलांचे मळे बहरू लागले आहेत. त्याचबरोबरीने फुले, हार, प्रसादविक्री हा शिर्डीतील एक प्रमुख व्यवसाय झाला.


साईबाबा संस्थानचे विश्वस्त मंडळाने केला ठराव शनिशिंगणापूरप्रमाणे शिर्डीतही फुले, हार, प्रसादाचे ताट अव्वाच्या सव्वा दराने काही लोक विक्री करू लागले आहेत. भाविकांमध्ये नाराजी पसरू लागली आहे. अनेकदा चर्चाही झाली. नगरपंचायतीने शिर्डी गावात लावण्यासाठी दरपत्रकाचे फलकही बनविले. मात्र, कुठे माशी शिंकली की ते बोर्ड धुळखात पडले होते. साईमंदिरात फुले वाहिली जात असल्याने अनेक वेळा फुले ही समाधीवरून खाली पडून भक्तांच्या पायाखाली येत. तसेच, साई मंदीराच्या गर्भगृहातही फुले पडत. त्यामुळे फरशी चिकट होत असे. दिवसभरात अनेक वेळा स्वच्छता करावी लागत असत. त्यामुळे मंदिरात फुले, हार याचबरोबरीने प्रसादही बंद करण्याचा ठराव साईबाबा संस्थानने विश्वस्त मंडळानी केल्याची माहिती विश्वस्त एकनाथ गोंदकर यांनी सांगितले आहे.


सामाजिक कार्यकर्त्याचे अनोखे आंदोलन दुसरीकडे मात्र साईबाबांच्या समाधीवर हार फुले चढविण्याची शेकडो वर्षांची परंपरा चालत असल्याने कोविड काळात आणि नंतर बंद केलीली फुल हार चढविण्याची पध्दत पुन्हा सुरू करावी, ही मागणी होत आहे. मा. सर्वोच्च न्यायालय यांनी ह्या विश्वस्त मंडळाला धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी कुठली अधिकार नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी कोपरगाव ते शिर्डी डोक्यावर फुलांची परडी घेत पायी येऊन द्वाराकामाईसमोर येत आहे. ओ बानायत बाई, तुम्हाला सातवा वेतन आयोग लागू आहे, मात्र शेतकऱ्यांना काही मिळत नाही, त्यांची फुले समाधीवर वाहू द्या, अशी आरोळी देत फुले, हार, प्रसाद सुरू करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा Maharashtra Monsoon Session विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून घोषणाबाजीला सुरुवात 50 खोके एकदम ओक्केची पुन्हा एकदा घोषणाबाजी

ABOUT THE AUTHOR

...view details