महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Seed Rakhi : पद्मश्री राहीबाईंची 'बीज राखी'; भाजप नेते चंद्रकांत पाटलांंसाठी बनवली खास राखी - पद्मश्री राहीबाई

अकोले तालुक्यातल्या पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांनी आपल्या भावासाठी म्हणजेच भाजपचे जेष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील यांच्यासाठी बीज राखी ( Seed Rakhi ) बनवली आहे. या माध्यमातून एक अनोखी व जगावेगळी भेट आपल्या भावाला दिलेली आहे ( Seeds Rakhi For BJP leader Chandrakant Patil ). भात, नागली, वरई, काकडी, भोपळा यांसारख्या अनेक प्रकारच्या गावरान बियांचा वापर करून त्यांनी या राख्या स्वतःच्या हाताने बनवलेले आहेत.

beej rakhi
बीज राखी

By

Published : Aug 10, 2022, 9:54 AM IST

शिर्डी :सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीते भाऊ राया रे वेड्या बहिणीची रे वेडी माया ! या मराठी गीतातील सुंदर ओळींमधून बहीण भावाच्या नात्याची आपुलकी आणि माया आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. अगदी या गीताला शोभेल असेच अकोले तालुक्यातील पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे ( Padmashri Rahibai ) यांनी आपल्या भावासाठी म्हणजेच भाजपचे जेष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील यांच्यासाठी बीज राखी ( Seed Rakhi ) बनवून एक अनोखी व जगावेगळी भेट आपल्या भावाला दिलेली आहे ( Seeds Rakhi For BJP leader Chandrakant Patil ).

पद्मश्री राहीबाईंची बीज राखी

गावरान बिया वापरून बनवली राखी -भात, नागली, वरई, काकडी, भोपळा यांसारख्या अनेक प्रकारच्या गावरान बियांचा वापर करून त्यांनी या राख्या स्वतःच्या हाताने बनवलेले आहेत ( Rakhi made by using seeds ). भाजप जेष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील यांना बंधू मानलेल्या पद्मश्री राहीबाई यांनी आजपर्यंत बीज बँकेच्या रूपाने महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांना आपल्या विशेष प्रेमाने व आदराने भाऊ बनवून घेतले आहे. राहीबाई यांच्या वात्सल्य आणि प्रेमापोटी हजारो शेतकरी त्यांना आपली बहीण मानतात. या शेतकऱ्यांच्या प्रेमापोटी व त्यांचा मनस्वी आदर राखण्यासाठी त्यांनी या बीज राख्यांची निर्मिती केली आहे.

बीज राख्यांची विशेष मोहीम -भाजप ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील राहीबाई यांना आपल्या भगिनी मानतात व राहीबाई सुद्धा त्यांना तेवढेच आदराचे स्थान देतात हे सर्वश्रूत आहे. आपल्या या प्रेमळ भावासाठी त्यांनी बीज राख्यांची विशेष मोहीम राबवली ( conduct special campaign of seeds rakhi ) आहे. त्याचप्रमाणे देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या प्रती प्रेम आणि आदर भावना मनामध्ये ठेवून एक धागा राष्ट्रबांधणीचा या विचारांना पुढे नेण्यासाठी त्यांनी या राख्या बनवल्याचे सांगितले आहे. बीज राख्यांची निर्मिती करून त्यांनी करत असलेल्या कार्याप्रती आपण किती एकनिष्ठ आणि एकरूप आहोत हे दाखवून दिले आहे. कुठलेही काम निष्ठेने केल्यास तेच काम आपल्याला सर्वोच्च स्थानी नेत असते हेच वेळोवेळी राहीबाईंच्या उदाहरणातून समोर आले आहे. राखी पौर्णिमा या सणानिमित्त त्यांनी सर्व देश बांधवांना बीज राखीच्या रूपाने अनोखी भेट व शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा -RJD JDU Govt In Bihar : नितीश कुमार आठव्यांदा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ, तेजस्वी यादव यांना उपमुख्यमंत्रीपद

ABOUT THE AUTHOR

...view details