महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिर्डी लोकसभा मतदारसंघ शत प्रतिशत करण्यासाठी भाजपची मोर्चेबांधणी, 'हे' मंत्री तीन दिवस येणार दौऱ्यावर - भाजपची मोर्चेबांधणी

केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल (Union Minister Prahlad Patel) यांचे १० सप्टेंबर रोजी शिर्डीत (Shirdi) आगमन होणार असून साई दर्शन घेवून कोपरगाव (Kopargaon) येथील कार्यक्रमासाठी रवाना होणार आहेत. आ.डॉ राहूल आहेर (Dr. Rahul Aher)म्हणाले लोकसभा प्रवास योजने अंतर्गत केंद्रीय मंत्र्यांचा पहीला दौरा असून भविष्यात असे सहा दौरे होणार आहेत. राज्यातील १४ मतदार संघात केंद्रीय मंत्री तीन दिवसांचा दौरा करुन आढावा घेणार आहेत.

Shirdi tour
शिर्डी दौरा

By

Published : Sep 9, 2022, 5:58 PM IST

शिर्डी : शिर्डी लोकसभा मतदारसंघ (Shirdi Lok Sabha Constituency) शत प्रतिशत भाजप करण्यासाठी संघटनात्मक पातळीवर जोरदार तयारी सुरू केली असून मतदार संघात लोकसभा प्रवास योजनेच्या निमिताने दि.१० ते १३ सप्टेंबर दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल (Union Minister Prahlad Patel) तीन दिवसांचा दौरा करणार असून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लोकसभा मतदार संघाचे प्रभारी डॉ. राहूल आहेर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे केंद्रीय मंत्र्याच्या दौर्याचे तालुका निहाय नियोजन निश्चित करण्यात आले.

भाजपचा खासदार निवडून आणाण्याचा निर्धार : राज्यातील १४ लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे खासदार निवडून आणण्यासाठी संघटनात्मक पातळीवर काम सुरू झाले आहे.शिर्डी लोकसभा मतदारसंघातही पक्षाच्या वतीने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना लोकसभा मतदार संघाचे प्रमुख आणि आ.डॉ. राहूल आहेर यांना प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. लोकसभा मतदारसंघात संघटनात्मक कामा बरोबरच केंद्र सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेतला जात असून बुथ स्तरापर्यंत नियोजनबध्द पध्दतीने पुढील १७ महीने काम करून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून भाजपचा खासदार निवडून आणाण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.यापुर्वी प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत लोकसभा प्रवास योजनेतील विविध कामावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते.

भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्याची बैठक संपन्न : राज्यातील १४ मतदार संघात केंद्रीय मंत्री तीन दिवसांचा दौरा करुन आढावा घेणार आहेत. शिर्डी मतदार संघातही केंद्र राज्यमंत्री प्रल्हाद पटेल पुढील तीन दिवस लाभार्थी संघ परीवार तसेच समाजातील विविध मान्यवरांशी संवाद साधणार आहेत.मतदार संघात केंद्र सरकारच्या योजनांच्या झालेल्या अंमलबजावणीचा आढावाही शासकीय अधिकाऱ्यांचा बैठकीत घेण्यात येणार असल्याची माहीती भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी सांगितले.शिर्डी लोकसभा मतदारसंघात दि.१०ते १३ सप्टेंबर दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांचा पहीला दौरा निश्चित करण्यात आला आहे.या दौर्यात अकोले संगमनेर राहाता कोपरगाव श्रीरामपूर नेवासा या तालुक्यात मंत्री प्रल्हाद पटेल जनसंघ,भाजप पदाधिकारी कार्यकर्ते महीला आघाडी योजनांचे लाभार्थी यांच्याशी थेट गावात आणि बुथ स्तरापर्यत जावून संवाद साधणार आहेत.या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजनासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रभारी आ.डाॅ.राहूल आहेर यांच्या उपस्थितीत प्रवरानगर येथे भारतीय जनता पक्षाच्या उतर नगर जिल्ह्याची बैठक संपन्न झाली. प्रारंभी राधाकृष्ण विखे पाटील यांची मंत्री पदावर निवड झाल्यबद्ल पदाधिकार्याच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कसा असेल केंद्रीय मंत्र्यांचा दौरा : शिर्डी लोकसभा मतदारसंघ शत प्रतशित भाजप करण्यासाठी पुढील १७ महीन्याचे नियोजन प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बुथ स्तरापर्यत करण्याचे आवाहन करतानाच मतदार संघातील सर्व विधानसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांचा पहीला दौरा ठरलेल्या नियोजना प्रमाणे यशस्वी करण्याचे आवाहन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.आमदार डॉ राहूल आहेर म्हणाले, की लोकसभा प्रवास योजने अंतर्गत केंद्रीय मंत्र्यांचा पहीला दौरा असून भविष्यात असे सहा दौरे होणार आहेत.या दौर्याच्या निमित्ताने संघटनात्मक पातळीवर तसेच समाजातील शेवटच्या घटकापर्यत आणि योजनांच्या लाभार्थी पर्यत पोहचण्याची संधी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांचे १० सप्टेंबर रोजी शिर्डीत आगमन होणार असून साई दर्शन घेवून कोपरगाव येथील कार्यक्रमासाठी रवाना होणार आहेत. दि.११ सप्टेंबर रोजी शिर्डी राहाता संगमनेर येथे भाजप पदाधिकारी लोकसभा समन्वय समिती योजनांचे लाभार्थी तसेच सरपंच जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांशी संवाद साधणार आहेत.संगमनेर येथे कोव्हीड लसीकरण आढावा तसेच जिल्ह्यातील सर्व अधिकार्यां समवेत केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीची माहीती जाणून घेणार असून अकोले येथे महीलांचा मेळावा आयोजित करण्यात आल्याचे संघटन सरचिटणीस नितीन दिनकर यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details