अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांनी देशाच्या आरोग्य व्यवस्थेला विकासाशी जोडल्याने देशातील आरोग्य व्यवस्थेत अमूलाग्र बदल होत आहेत. आरोग्याच्या संदर्भात पुढील अनेक वर्षांचे धोरण निश्चित करून ( Health Department focus on Covid related cases ) संशोधनाला गती दिल्यामुळे देश आज खंबीरपणे उभा असल्याचे असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय ( Union Health Minister Mansukh Mandaviya ) यांनी व्यक्त केले. याच अनुषंगाने कोविडच्या नुकत्याच आढळून आलेल्या नव्या ओमियोक्रोन, त्याचे उपव्हेरियन्टवर संशोधक लक्ष ठेवून आहेत. व्हेरियन्ट सौम्य आहे की घातक यावर आरोग्य विभागाच्या शास्त्रज्ञानाचे लक्ष असते अशी माहिती त्यांनी दिली. पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील फौडनशच्या वतीने विकसीत करण्यात आलेल्या कॅन्सर सेंटर पेट स्कॅन तसेच न्युक्लिअर मेडीसिन विभागाचे लोकार्पण मंत्री मांडवीय यांच्या हस्ते करण्यात आले.
प्राथ आरोग्य केंद्राचे उदघाटन -मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते पारनेर आणि पढेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण दूरदृष्य प्रणाली द्वारे करण्यात आले. विखे पाटील परीवाराने सुरू केलेल्या सेवेच्या यज्ञाचे कौतुक करून मंत्री मांडवीय म्हणाले की,पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली या देशात विविध क्षेत्रात संधी निर्माण होत आहेत तशाच संधी आरोग्य व्यवस्थेत सुध्दा उपलब्ध झाल्या आहेत.प्रधान मंत्र्यांनी देशाच्या आरोग्य व्यवस्थेला प्रथमच विकासाशी जोडले.स्वांतत्र्यानंतर हे प्रथमच घडले असल्याकडे लक्ष वेधून समाजाचे स्वास्थ्य चांगले असेल तरच राष्ट्राचे स्वास्थ्य चांगले राखले जावू शकते हा त्यांचा विचार प्रत्येक निर्णयामागे असल्याचे त्यांनी सांगितले.
उपचार नव्हे तर निरोगी जीवन हे धोरण - देशात आरोग्य व्यवस्थेचे धोरण निश्चित करताना केवळ उपचार नव्हे तर प्रत्येक व्यक्तीला निरोगी जीवन जगता यावे यासाठी चांगली जीवनशैली विकसित करण्यासाठी सुविधांनी परीपूर्ण आशी आरोग्य केंद्र विकसित करताना चांगले वेलनेस सेंटर उभारण्यावर केंद्र सरकारने भर दिला असून,आतापर्यत १ लाख २५ हजार वेलनेस सेंटर उभारण्यात आले असून दिडलाखाचे उद्दिष्ट लवकारच सरकार पूर्ण करेल असा विश्वास मंत्री मांडवीय यांनी व्यक्त केला.