अहमदनगर - राहाता तालुक्यातील रुई येथे एक कोरोनाबाधित आढळून आला आहे. यामुळे या रुग्णाच्या संपर्कातील शिर्डीतील एका बँकेतील 25, साई संस्थानातील सुरक्षा विभागातील 5 आणि रुई गावातील 10 व्यक्तींना साई संस्थानच्या आश्रम येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांचे स्त्राव नमुने आज (गुरुवारी) सकाळी घेण्यात आले आहेत, अशी माहिती राहाताचे तहसिलदार कुंदन हिरे यांनी दिली.
कोरोना विषाणु संसर्ग तपासणीचा बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालात राहाता तालुक्यातील रुई येथील एक व्यक्ती बाधित आढळून आला. हा व्यक्ती शिर्डीतील युनियन बँकेत सेवेत होता. मात्र, त्याचा थेट संपर्क ग्राहकांसोबत येत नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तेव्हा त्याच्या संपर्कातील बँकेतील 25, साई संस्थानातील 5 आणि रुई गावातील 10 अशा व्यक्तींचे, स्त्राव नमुने घेण्यात आले आहेत. तसेच त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
तर बाधित रुग्णाचा बँकेतील ग्राहकांसोबत संपर्क नसल्याने कोणीही घाबरुन जावू नये. मात्र, स्वयंशिस्त आणि शासनाने वेळोवेळी जारी केलेल्या नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे. म्हणून स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन तहसिलदार हिरे यांनी यावेळी केले.
राहाता तालुक्यातील रुई गावासाठी शासनाने काढला आदेश -