शिर्डी (अहमदनगर) - अकोले तालुक्यातील वडगाव येथे शेततळ्यात बुडून काका आणि पुतण्याचा मृत्यू झाल्याची धक्का दायक घटना घडली. कार्तिक सुनील गोर्डे (वय - 20) आणि अनिल खंडू गोर्डे (वय 45) अशी मृतांची नावे आहेत.
शेततळ्यात बुडून काका-पुतण्याचा मृत्यू; अकोले तालुक्यातील धक्कादायक प्रकार - uncle nephew died shirdi
पिंपळगाव निपाणी- वडगाव लांडगा रोडवर भीमाशंकर गोर्डे यांच्या शेततळ्यात आज (रविवारी) दुपारी दोन वाजताच्या सुमारास कार्तिक गोर्डे पोहण्यासाठी गेला होता. तो पोहताना पाण्यात बुडाला. यावेळी त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या अनिल गोर्डे यांनी पाण्यात उडी घेतली. मात्र, शेततळ्याच्या प्लॅस्टिक कागदामुळे त्यांनाही बाहेर येता आले नाही.
पिंपळगाव निपाणी- वडगाव लांडगा रोडवर भीमाशंकर गोर्डे यांच्या शेततळ्यात आज (रविवारी) दुपारी दोन वाजताच्या सुमारास कार्तिक गोर्डे पोहण्यासाठी गेला होता. तो पोहताना पाण्यात बुडाला. यावेळी त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या अनिल गोर्डे यांनी पाण्यात उडी घेतली. मात्र, शेततळ्याच्या प्लॅस्टिक कागदामुळे त्यांनाही बाहेर येता आले नाही. यामुळे दोन्ही काका-पुतण्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. यानंतर परिसरातील आणि घरातील लोकांनी शेततळे फोडून त्यांचा मृतुदेह बाहेर काढला.