शिर्डी- लोकसभा मतदारसंघात आता प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा आयोजित केल्या जात आहेत. कोपरगावात आदित्य ठाकरेंच्या सभेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची आज संगमनेर येथील जाणता राजा मैदानावर सभा होणार आहे. युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली आहे.
सदाशिव लोखंडेंच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंची आज संगमनेरमध्ये सभा - shivsena
आज संगमनेर येथील जाणता राजा मैदानावर सभा होणार आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात देशतील किंवा राज्याच्या कुठल्याही दिग्गज नेत्यांची सभा अद्यापपर्यंत झाली नव्हती. त्यामुळे उद्धव ठाकरे आजच्या सभेत काय बोलणार याकडे मतदारसंघातील नागरिक, शिवसैनिक आणि त्याचबरोबर विरोधकांचेही लक्ष लागले आहे.
जाणता राजा मैदानावर होणाऱ्या सभेची जय्यत तयारी सुरु आहे. त्यासाठी भव्य सभा मंडप उभारण्यात आला आहे. या सभेच्या तयारीसाठी शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक कामाला लागले असून संगमनेर शहरात ठिकठिकाणी स्वागताची प्रवेशद्वारे उभारण्यात आली आहेत.