अहमदनगर - पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या चौंडीला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. या स्मारकाच्या माध्यमातून त्यांचे विचार जीवंत राहतील, भावी पिढीला ते प्रेरणादाई ठरेल. याबाबत महाराष्ट्र सरकारने लक्ष देण्याची गरज असल्याचेही उदयनराजे म्हणाले.
अहिल्याबाई होळकरांच्या जन्मस्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा - खासदार उदयनराजे भोसले - udayanraje-bhosale
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या चौंडीला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.
खासदार उदयनराजे भोसले
आज अहिल्याबाई होळकर यांची जयंती आहे. त्यानिमित्त चौंडी येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमानंतर उदयनराजेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अहिल्याबई होळकर यांचे जन्मगाव राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी पालकमंत्री राम शिंदेंनी पुढाकार घ्यावा असेही उदयनराजे म्हणाले. धनगर समजाव्यतिरीक्त सर्वच समाजाची ही मागणी आहे. ज्यांनी ज्यांनी देशाला दिशा देण्याचे काम केले. त्यांची स्मारके व्हावी, यातून तरुणांनी बोध घ्यावा असेही उदयनराजे म्हणाले.