महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अवघ्या दोन वर्षाची प्रविशा ठरली 'गर्ल विथ हाय मेमरी स्किल' - OMG बुक ऑफ रोकॉर्ड्समध्ये प्रविशाची नोंद

संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला गावच्या दोन वर्षीय चिमुकलीची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. दोन वर्षीय प्रविशाची लवकर लक्षात ठेवण्याची क्षमता ही मोठ्यांनाही मागे टाकते आहे. त्यामुळेच प्रविशा विशाल उबाळे हिने वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी स्वतःचे नाव OMG बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवले आहे.

दोन वर्षाची प्रविशा उबाळे
दोन वर्षाची प्रविशा उबाळे

By

Published : Jun 5, 2021, 4:28 PM IST

अहमदनगर -संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला गावच्या दोन वर्षीय चिमुकलीची सध्या जगभरात चर्चा सुरू आहे. दोन वर्षीय प्रविशाची लवकर लक्षात ठेवण्याची क्षमता ही मोठ्यांनाही मागे टाकते आहे. त्यामुळेच प्रविशा विशाल उबाळे हिने वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी स्वतःचे नाव OMG बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवले आहे.

दोन वर्षाची प्रविशा उबाळे ठरली 'गर्ल विथ हाय मेमरी स्किल'

OMG बुक ऑफ रोकॉर्ड्समध्ये प्रविशाची नोंद

महाराष्ट्रातील संत, सोशल मीडिया आयकॉन्स, पन्नासहून अधिक प्राणी-पक्षी, फळे, वाहने, मानवी अवयव, रंगांच्या सर्व छटा, भूमितीय आकार, इंग्रजीतील अक्षरे, अंक अगदी अचूकपणे प्रविशा उबाळे सांगत आहे. ओएमजी बुक ऑफ रोकॉर्ड्समध्ये गर्ल वीथ हाथ मेमरी स्किल्स या शीर्षकाखाली प्रविशा उबाळे हिचे नाव आणि तिने केलेल्या गोष्टींची नोंद झाली असून प्रविशाला प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.

वयाच्या १२ महिन्यांपर्यंत तिने दाखवली नवनविन गोष्टी शिकण्यात आवड

संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला येथील प्रविशा वयाच्या ९व्या महिन्यापासूनच चौकस बाळ होते. वयाच्या १२ महिन्यांपर्यंत तिने नवनवीन गोष्टी शिकण्यात आवड दाखवली. प्रविशा ही अनेक इंग्रजी शब्द, अंक, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, गौतम बुद्ध इत्यादी संत, सोशल मीडीया आयकॉन्स, शरीराचे सर्व अवयव, रहदारीची वाहने, पाळीव तसेच जंगली प्राणी, टीव्हीवरील कलाकार, इंद्रधनुचे रंग, फळे, भाज्या, प्राण्यांचे, पक्ष्यांचे आवाज ओळखणे यात निपूण आहे. ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदणी तसेच पुढील प्रक्रिया यामध्ये OMG बुकचे प्रतिनिधी म्हणून राहुल बनसोडे यांनी काम पाहिले.

हेही वाचा -मान्सून महाराष्ट्रात दाखल, येत्या दोन दिवसांत 'या' जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता

ABOUT THE AUTHOR

...view details