महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Women Drowned In River : कपडे धुवायला नदीत उतरल्या अन् पाय घसरून बुडाल्या; मावशी भाचीला गोदावरीत जलसमाधी - Women Drowned In River

कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव शिवारात गोदावरी नदीकाठी कपडे धुण्यासाठी गेलेल्या मावशी भाचीवर काळाने घाला घातला. दरम्यान गोदावरी नदीच्या पाणीपत्रात बुडून (two woman died in Godavari River) मावशी भाचीचा दुर्दैवी मृत्यू (Two women drowned in river) झाल्याची धक्कादायक घटना 26 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. (Ahmednagar crime) (Ahmednagar News)

Women Drowned In River
Women Drowned In River

By

Published : Oct 26, 2022, 6:10 PM IST

अहमदनगर : दिवाळीनिमित्त भाऊबीजेची सर्वत्र धामधूम सुरू असताना कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव शिवारात गोदावरी नदीकाठी कपडे धुण्यासाठी गेलेल्या मावशी भाचीवर काळाने घाला घातला. दरम्यान गोदावरी नदीच्या पाणीपत्रात बुडून (two woman died in Godavari River) मावशी भाचीचा दुर्दैवी मृत्यू (Two women drowned in river) झाल्याची धक्कादायक घटना 26 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. या दुर्दैवी घटनेने कान्हेगावसह कोपरगाव तालुक्यात (woman drowning in river Kopergaon Ahmednagar) हळहळ व्यक्त होत आहे. अर्चना जगदीश सोनवणे (वय ३५ रा. नाशिक) आणि गौरी शरद शिंदे (वय १८ रा. म्हसरूळ नाशिक) असे मृत्यू झालेल्या मावशी व भाचीचे नाव आहे. याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (Ahmednagar crime) (Ahmednagar News)


पाण्यात पाय घसरला आणि झाला मृत्यू -याबाबत अधिक माहिती अशी की, अर्चना जगदीश सोनवणे व गौरी शरद शिंदे हे कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव येथे मंगेश चव्हाण यांकडे म्हणजेच मामाच्या गावी दिवाळीच्या सुट्टी निमित्त आले असता आज सकाळी गोदावरी नदीला पाणी असल्याने नदीकाठी काही महिला व एक मुलगा धुणं धुण्यासाठी गेले होते. यावेळी मावशी व भाचीचा पाय घसरून ते पाणी पात्रात पडले. त्यांना वाचवण्यासाठी इतर 3 महिलांनी पाण्यात उडी मारली. मात्र त्यांना देखील पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडणार असल्याचे समजल्यावर जवळच असलेल्या एका मुलाने पाण्यात उडी मारून तिघा महिलांना वाचवले. मात्र या दोघींना वाचवण्यात त्याला अपयश आले अशी स्थानिकात चर्चा आहे.

अकस्मात मृत्यूची नोंद -घटनेची माहिती वाऱ्यासारखी कान्हेगाव परिसरात पसरली आणि अनेक जण नदीकाठी पोहोचले. त्यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी व त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढून कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले. मात्र उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. याबाबत कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीएसआय तुषार धाकराव पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह पोहोचून पंचनामा केला आहे. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव हे तपास करीत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details