महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगरच्या शेवगावात दरोडा, दोन गंभीर जखमी - Shegaon robbery

शेवगाव शहरात दरोडेखोरांच्या मारहाणीत 2 जण जखमी झाल्याची घटना घडली. दोन्ही जखमींना नगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरडाओरड झाल्याने चोरट्यांचा प्रयत्न अशस्वी झाला.

robbery in Shegaon
अहमदनगरच्या शेवगावात दरोडा

By

Published : Dec 10, 2019, 12:36 AM IST

अहमदनगर- शेवगाव शहरात दरोडेखोरांच्या मारहाणीत 2 जण जखमी झाल्याची घटना घडली. दोन्ही जखमींना नगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरडाओरड झाल्याने चोरट्यांचा प्रयत्न अशस्वी झाला. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.

शहारात जैन गल्ली परिसर भागात राहणारे मुरलीशेठ धुत यांच्या घरावर सोमवारी रोजी पहाटे ३.१५ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. यात दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत मुरलीशेठ धूत (वय ५९) व सविता धूत (वय ५३) हे दोघे पती पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ नगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर दरोडेखोरांच्या हाती काही न लागता ते पळून गेल्याने पुढील अनर्थ टळला.

सोमवारी पहाटे जैन गल्ली परिसरात असणाऱ्या धुत यांच्या घरात चोरटयांनी मागील बाजुने प्रवेश केला. तिजोरीची चावी कुठे आहे, असे म्हणत मुरलीशेठ धूत, सविता धूत यांना बॅटने जबर मारहाण केली. चोरटयांच्या हातात तिजोरीची चावी मिळताच त्यांनी तिजोरी उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोड माहीत नसल्याने ही तिजोरी उघडली जात नव्हती. म्हणून काही चोरटे कोड विचारण्यास वरच्या मजल्यावर झोपलेल्या धूत यांच्या मुलांकडे जात असतानाच जखमीनीं आरडाओरड सुरु केली. त्यामुळे चोरट्यांनी तेथून पळ काढल्याने पुढील अनर्थ टळला. धुत यांनी तत्काळ पोलीसांशी संपर्क साधताच पोलीस नाईक राजु चव्हाण घटनास्थळी दाखल झाले, रात्रीचे गस्त पथकही घटनास्थळी आले.

दरोडेखोरांच्या मारहाणीत जखमी झालेल्या धूत दांम्पत्यांवर नगर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी शेवगाव पोलीस त्यांच्या जबाबासाठी नगरला गेल्याने रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

ABOUT THE AUTHOR

...view details