महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भगवानगडावरील दोन रायफलींची चोरी... चोरटे सीसीटीव्हीत कैद! - भगवानगडावर चोरी

भगवान बाबांच्या वापरातील दोन रायफली गायब झाल्या आहेत. गडावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत चोरांचे दृश्य कैद झाले आहे. याप्रकरणी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

two-rifle-stolen-from-bhagwangad-in-ahmednagar
two-rifle-stolen-from-bhagwangad-in-ahmednagar

By

Published : Feb 28, 2020, 9:58 AM IST

अहमदनगर- पाथर्डी तालुक्यातील भगवानगडावर भगवान बाबांच्या वापरातील वस्तू संग्रहीत आहेत. मात्र, या संग्रहातील दोन रायफली गायब झाल्या असल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आले.

हेही वाचा-राजर्षी शाहू महाराज भारतरत्न पेक्षा मोठे - संभाजीराजे छत्रपती

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरिक्षक राठोड हे भगवान गडावर आले होते. गडावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची त्यांनी तपासणी केली. त्यात मध्यरात्रीच्या सुमारास एका दुचाकीवरुन आलेल्या तीन अज्ञात व्यक्ती रायफल घेऊन जातानाचे दृश्य कैद झाले आहे. यात त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नाहीत. याप्रकरणी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details