महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणीचे 2 अधिकारी लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात

तक्रारदाराने या अधिकाऱ्यांनी लाचेची मागणी केल्याची तक्रार अहमदनगर लाच-लुचपत विभागाकडे केली होती. त्यानुसार अनुसूचित जमाती प्रमाणापत्र तपासणी समिती नाशिकचे उपसंचालक रामचंद सोनकवडे आणि विधी अधिकारी शिवाप्रसाद काकडे हे अधिकारी ही लाच स्विकारण्यासाठी मुख्यालय सोडून शिर्डीला आले होते.

अहमदनगरमध्ये 2 अधिकारी लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात

By

Published : Sep 5, 2019, 6:01 PM IST

अहमदनगर- अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समीतीच्या 2 अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना एसीबीने (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) रंगेहात पकडले आहे. या अधिकाऱ्यांनी तक्रारदाराकडे एस टी प्रवर्गाचे जात वैधता प्रमाणात मिळवून देण्यासाठी 5 लाख रुपयांची मागणी केली होती. रामचंद सोनकवडे आणि शिवाप्रसाद काकडे, अशी अधिकाऱ्यांची नावे आहेत.

अहमदनगरमध्ये 2 अधिकारी लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात

हेही वाचा-सार्वजनिक बांधकाम विभागातील दोन महिला कर्मचाऱ्यांना १२०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदाराने या अधिकाऱ्यांनी लाचेची मागणी केल्याची तक्रार अहमदनगर लाच-लुचपत विभागाकडे केली होती. त्यानुसार अनुसूचित जमाती प्रमाणापत्र तपासणी समिती नाशिकचे उपसंचालक रामचंद सोनकवडे आणि विधी अधिकारी शिवाप्रसाद काकडे हे अधिकारी ही लाच स्विकारण्यासाठी मुख्यालय सोडून शिर्डीला आले होते. येथील साई आसरा हॉटेल मध्ये त्यांनी तक्रादारास पैसे घेवुन बोलवले. त्यावेळी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास हॉटेल साई आसरा समोर सापळा रचत एसीबीचे अहमदनगरचे पोलीस उपअधिक्षक हरीश खेडकर यांनी आपल्या पथकासह या अधिकाऱ्यांना रंगेहात पकडले.

हेही वाचा-परभणीत 10 हजारांची लाच मागितल्या प्रकरणी उपसरपंचास अटक

यामध्ये पोलिसांनी नाशिकचे उपसंचालक रामचंद्र रतिलाल सोनकवडे, विधी अधिकारी शिवप्रसाद मुकुंदराव काकडे खासगी व्यक्ती सचिन उत्तमराव महाजन, मच्छिंद्र मारुती गायकवाड, यांना अटक केली आहे. या सर्वांना कोपरगाव येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details