अहमदनगर - राहता तालुक्यातील दोघांचे अहवाल कोरोनापॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये राहता शहरातील बोठे गल्ली येथे राहणारा 36 वर्षीय व्यक्ती आणि तालुक्यातील निमगाव येथील 23 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राहता शहरातील बोठे गल्ली परिसर बंद करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे.
राहता तालुक्यात आणखी 2 जण कोरोना पॉझिटिव्ह
राहता शहरातील बोठे गल्ली परिसर बंद करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. या भागातील दुकाने बंद केली जात आहेत. तसेच कोरोनाबाधित आढळलेला हा रुग्ण शहरातीलच असून त्याला कोरोना संसर्ग कसा झाला? याचा शोध घेतला जात आहे.
अहमदनगर कोरोना बातमी
या भागातील दुकाने बंद केली जात आहेत. तसेच कोरोनाबाधित आढळलेला हा रुग्ण शहरातीलच असून त्याला कोरोना संसर्ग कसा झाला? याचा शोध घेतला जात आहे, तर रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेवून त्यांना क्वारंटाईन केले जाणार असल्याची माहिती तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली आहे.
दरम्यान, निमगाव आधीच कंटेन्मेंट झोन जाहिर असून निमगाव निघोज येथील 23 वर्षीय तरुणाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.