महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

श्रीरामपुरात दोन तरुण गोदावरी नदी पात्रात बुडाले; एकाचा मृतदेह सापडला - men drown in godawari

श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळ वाडगाव येथे दोन तरुण गोदावरी नदी पात्रात बुडाल्याची घटना उघडकीस आली आहे. यातील एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे.

men drown in godawari
श्रीरामपूरात दोन तरुण गोदावरी नदी पात्रात बुडाले; एकाचा मृतदेह सापडला

By

Published : Aug 10, 2020, 1:16 PM IST

अहमदनगर - श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळ वाडगाव येथे दोन तरुण गोदावरी नदी पात्रात बुडाल्याची घटना उघडकीस आली आहे. यातील एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे.

श्रावणी सोमवार असल्याने श्रीरामपूर तालुक्यातील महांकाळ वाडगाव येथील सचिन बाजीराव वानखेडे (वय 28), भाऊराव पांडुरंग वानखेडे (वय 35) हे दोन तरुण सकाळी नदीवर आंघोळीसाठी गेले. स्नान करून ते गावातील महादेवाचे मुख्य दर्शन घेऊन घरी जाणार होते. मात्र, खोलीचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी 6.30 च्या सुमारास घडली.

दोघेही विवाहित असून सचिन यांच्या पाठीमागे पत्नी एक मुलगा एक मुलगी आई, वडील तर भाऊराव यांस पत्नी, तीन मुली एक मुलगा आई ,वडील असा परिवार आहे. या घटनेमुळे महांकाळ वाडगांवावर शोककळा पसरली आहे.

नाऊर येथील पट्टीच्या पोहणाऱ्या तरुणांकडून मदतकार्य सुरू असून होडीच्या सहाय्याने शोधकार्य सुरू आहे. भाऊराव यांचा मृतदेह सापडला असून सचिनचा शोध सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details