अहमदनगर - जिल्ह्यात आज कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या संगमनेर येथील 63 आणि 65 वर्षीय महिलांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज 5 जण कोरोनामुक्त झालेे आहेत.
दोन्ही महिलांना अती उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केल्यापासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आज त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली. संगमनेर शहरातील असलेल्या या महिला दिनांक 6 जून रोजी बाधित आढळून आल्या होत्या.
पाच व्यक्तींची कोरोनावर मात -
जिल्ह्यातील आणखी 5 व्यक्ती कोरोनावर यशस्वी उपचार घेऊन आज घरी परतल्या आहेत. या व्यक्तींना वैद्यकीय तपासणीनंतर बूथ रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये अकोले, शेवगाव आणि संगमनेर येथील प्रत्येकी 1 तर नगर महापालिका क्षेत्रातील 2 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 141 कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.
आज जिल्ह्यात 9 नवीन रुग्णांची भर -
आज संगमनेर शहरातील तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मदिनानगर येथील 23 वर्षीय महिला बाधित आढळली आहे. पुनानाका नाईकवाडपुरा येथील ३५ वर्षीय व्यक्ती, मदिना नगर येथील ५२ वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित आढळले आहेत.
तर राहता तालुक्यातील दोघेजण, लिमगाव निघोज येथील २३ वर्षीय व्यक्ती, राहाता शहरातील बोठे गल्ली येथील ३६ वर्षीय व्यक्ती, नगर शहरातील पाचपीर चावडी माळीवाडा येथील एकूण ६९ वर्षीय व्यक्ती,
संगमनेर शहरातील मोमीनपुरा येथील 30 वर्षीय व्यक्ती,
मुंबईहून संगमनेर येथे आलेला 18 वर्षीय युवक,
नगर शहरातील पांचपीर चावडी माळीवाडा येथील 23 वर्षे युवक बाधित आढळले आहेत.
अहमदनगर कोरोना अपडेट -
जिल्हयातील अॅक्टिव केस - 74