अहमदनगर(शेवगाव) -मिरी रस्त्यावरील हॉटेल सासरवाडीजवळ गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. विजय भाकरे (वय 26) आणि पांडूरंग रामकृष्ण वाळके (वय 19), अशी या आरोपींची नावे आहेत. दोघेही अहमदनगर शहराच्या नागापूर भागातील रहिवासी आहेत.
सिनेस्टाईल पाठलाग करून आरोपींना घेतले ताब्यात; गावठी पिस्तुलासह काडतूस जप्त
शेवगाव पोलिसांनी दोघा संशयित तरुणांचा पाठलाग करून एक गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त केले. विजय भाकरे (वय 26) आणि पांडूरंग रामकृष्ण वाळके (वय 19), अशी या अरोपींची नावे आहेत. दोघेही अहमदनगर शहराच्या नागापूर भागातील रहिवासी आहेत.
मोटारसायकलवरून येणाऱ्या दोन तरुणांकडे गावठी कट्टा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून शेवगाव पोलिसांनी दोघा संशयित तरुणांचा पाठलाग केला. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली. या तरुणांकडे एक गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस सापडले. पोलिसांनी पिस्तूल, काडतूस आणि मोटारसायकल जप्त केले असून दोघा तरुणांना ताब्यात घेतले आहे. आरोपींविरोधात कलम 34 प्रमाणे शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगरचे पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, शेवगाव-पाथर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान गोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजीत ठाकरे, पोलीस नाईक महादेव घाडगे, पोलीस कॉन्स्टेबल कैलास पवार, भनाजी काळोखे, किशोर सिरसाठ, संदीप दरवडे यांनी ही कारवाई केली.